जत,प्रतिनिधी : जत पंचायत समिती इमारत व बांधकाम विभागाकडील शाखा अभिंयता ए.ए.शेख यांनी तब्बल 18 वर्षे एकाच जत तालुक्यात तळ ठोकला आहे. शेख यांचे अनेक कारनामे चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या आमसभेत त्यांच्या कारकीर्दीचे वाभाडे काढण्यात आले.आरपीआयचे नेते संजय कांबळे यांनी तर शेख यांची मालमत्ता व खातेनिहान चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या शेख यांचे प्रकरण जत तालुक्यात गाजत आहे.
हेही वाचा: 18 वर्षे तळ ठोकलेल्या अभिंयता शेखच्या भष्ट्राचाराच्या चौकशीसाठी उपोषण
नुकतेच झालेल्या आमसभेमध्ये शाखा अभिंयता शेख यांच़्यावर जोरदार चिखलफेक झाली.आरपीआय नेते संजय कांबळे यांनी शेख यांच्यावर भष्ट्राचाराचे जाहीर आरोप केले.टक्केवारीसाठी दलित वस्ती सुधार योजनेची अनेक कामे शेख यांनी अडविली आहेत.शेख हे मराठवड्यातील रहवाशी असून 18 वर्षे त्यांनी एकाच तालुक्यात तळ ठोकला आहे. त्यांनी गावाकडे कोट्यावधी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे. त्या सर्व मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
आमसभेतील मागणीला जिल्हा परिषद प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या त्यामुळे आरपीआय कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत.त्यांनी काढलेल्या मोर्चामध्ये शेख यांच्या निलबंनाची मागणी केली.आरपीआयचे जेष्ठ नेते व माजी महापौर विवेक कांबळे यांनीही शेख यांच्यावर तोप डागली.त्यांनतरही प्रशासन शेख यांच्या पाठीशी ठामपणे राहिले.त्यामुळे गुरूवारी आरपीआय कार्यकर्त्यांनी जत तहसीलदार कार्यालया समोर एक दिवसाचे उपोषण केले.
हेही वाचा: करजगीत गँसचा स्फोट होऊन दोन लाखाचे नुकसान
आरपीआयने पंचायत समिती बांधकाम विभागातील भष्ट्र कारभाराला सुरूंग लागल्याने तालुकाभर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. पंचायत समिती बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची टक्केवारी,ठेकेदारांच्या नावावरर्ती स्व:ताच कामे घेऊन मुरमीकरण व दुरूस्त्याची बोगस कामे दाखवून बिले काढण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.अधिकाऱ्यांना राजकीय वरहस्त असल्याची जोरदार चर्चा आहे.
शेख या शाखा अभिंयत्याची जवळ जवळ सर्व कार्यकीर्द जत एकाच तालुक्यात गेली आहे.सलग,18 वर्षे ते पंचायत समितीत तळ ठोकून आहेत.त्यांची अनेकदा बाहेर बदली झाली तरी त्यांनी पुन्हा जतला बदली करून घेतली आहे.सध्या त्यांची नेमणूक तासगाव पंचायत समितीकडे आहे.तरीही कामगिरी बदली म्हणून ते जतमध्ये काम करतात.पंचायत समिती बांधकाम विभागात पुरेसा स्टॉप व अधिकारी असताना शेख यांची नेमणूक कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.यासर्व प्रकरणात जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी व अध्यक्ष यांनी लक्ष घालावे अशी तालुक्यातून मागणी होत आहे.
जत बंदचा इशारा
शाखा अभिंयता शेख यांची जत तालुक्यात नेमणूक करण्यामागे नेमके गौडबंगाल काय आहे. त्यांना तातडीने नेमणूकीच्या ठिकाणी हजर करण्याचा आदेश द्यावा अन्यथा जत बंद अंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआयचे नेते संजय कांबळे यांनी दिला आहे.