जत शहरात चोरीच्या सलग तीन घटनात लाखावर मुद्देमाल लंपास
जत,प्रतिनिधी : जत शहरात चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. पोलीसाचे छुपीने अशा चोरट्यांना बंळ मिळत आहे.गेल्या तीन दिवसात अशा तीन घटना घडल्या आहेत.त्यात सुमारे लाखभर रूपयाचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.शहरातील बसस्टँडवर जत-विजापूर असा प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाचे सोन्याचे दागिणे चोरीस गेले.महिलेच्या लक्षात आल्यानंतर प्रकरण पोलीलात गेले,बसही पोलीसानी तपासली मात्र दागिणे सापडले नाहीत.महिलेनेही फिर्याद न दिल्याने तपास पुढे झाला नाही. तिसऱ्या घटनेत बेजबाबदार पालिका प्रशासनामुळे शिवनगर मधील बालविद्यामंदिर रोडवर अंधाराचा फायदा घेत एकट्या चालेल्या महिलेच्या गळातील सोन्याचे दागिणे हिसका देऊन तोडण्याचा प्रयत्न झाला.मात्र महिलेने प्रंसगावधान राखत हात धरल्याने दागिणे तुटले नाहीत.
हेही वाचा: 18 वर्षे तळ ठोकलेल्या अभिंयता शेखच्या भष्ट्राचाराच्या चौकशीसाठी उपोषण
घटनेनंतर नागरिकांचा संताप पाहून नगरपरिषद प्रशासनाने लगेच विजेचे बंद बल्प बदलले.यांचाही गुन्हा पोलीसात दाखल झाला नाही.तिसऱ्या घटनेत शहरातील मध्यवर्ती मंगळवार पेठेतील महिहा मोबाईल शॉपीत जुना मोबाईल विकण्याच्या बहाण्याने वीस हाजार रूपये घेऊन दोन चोरट्यांनी दुचाकी वरून पलायन केले. त्यांचा पाटलाग केला मात्र ते फसार झाले. दरम्यान मोबाईल शॉपीचा मालक वसिम आत्तार व त्याचे मित्र पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासले त्यात पांढऱ्या पल्सर गाडीवर हेल्मेट घातलेले दोघे हनुमान मंदिरामार्गे,बँक ऑफ महाराष्ट्र रोडने भरधाव वेगाने गेल्याचे दिसले.त्याप्रकरणी रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.