जत | जवळील अपघातात नागजचे व्यापारी ठार |

0
3

जत,प्रतिनिधी ; विजापूर-गुहागर रस्त्यावर जत एमआयडीसीजवळ पाण़्याचा टँकर अंगावरून गेल्याने नागज (ता.कवठेमहांकाळ) येथील डाळीब संजय रंगराव रुपनूर,वय-39,रा. जागीच ठार झाले. ही दुर्घटना सोमवारी सांयकाळी घडली.

अधिक माहिती अशी,नागज  येथील डाळिंब व्यापारी संजय रुपनूर व त्याचे मित्र महादेव शिवाजी खोत रा.नागज हे दरिबडची येथील डांळिब बाग खरेदीसाठी दुचाकीवरून (एमएच-10,टी-5511) आले होते. बागेचा व्यवहार करून ते नागजकडे निघाले होते.  सध्या विजापूर -गुहागर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामावरील पाणी पुरवठा करणाऱ्या भरधाव टँकरने (क्र. केए-20,ए-5052) समोर धडक दिली. 

हेही वाचा: 

जत पुर्व भागात पाणी,चाराटंचाईने जतमधून स्थलांतर सुरू

एमआयडीसीसमोर हा अपघात झाला. त्यात रूपनूर यांच्या अंगावर टँकरचे चाक गेल्याने  त्यांचा जागीच मृत्यु झाला.तर पाठीमागे बसलेले महादेव खोत बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाल्याने बचावले आहेत. रूपनूर हे जत, सांगोला,कवठेमहाकांळ तालुक्यातील बागा खरेदी करून कमिशनवर व्यापाऱ्यांना देत होते.त्याचे जत तालुक्यात  कायम येणे-जाणे होते. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ,पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रूपनूर यांच्या आकस्मिक निधनाने नागज  गावावर शोककळा पसरली आहे. 

महामार्गाचे काम करताना वाहन चालकांच्या सुरक्षितेचे नियम संबधित ठेकेदारांकडून पाळले गेले नाहीत. कामावर कोठेही उकरले  जाते,कुठेही खड्डे निर्माण केले आहेत.पाणी मारून दलदल केली जात आहे. त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत.  कामावरील टँकरनेच बळी घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here