माडग्याळ | नजिक अपघातात युवक ठार |

0

माडग्याळ,वार्ताहर: माडग्याळ (ता.जत)पासून अर्ध्या किमी अंतरावर टँक्टर व दुचाकी अपघातात जाडरबोबलाद येथील संतोष जगन्नाथ लोहार (वय-25)हा युवक जागीच ठार झाला.घटना सोमवारी दुपारी घडली.

अधिक माहिती अशी,मुळ जाड्डरबोबलाद येथील संतोष हा चिपळून येथे विज जोडणीचा खाजगी कामे करतो.दिवाळीसाठी तो गावी आला होता.सोमवारी संतोष जतहुन जाडरबलादकडे क्रं.एमएच-10,सीके-3097 या दुचाकीवरून वरून येत असताना रस्ता कामासाठी पाणी मारणाऱ्या ट्रक्टर,टॅकंरला धडकून जागीच ठार झाला.मोटार सायकलने टॅकंरला पाठीमागून जोरदार धडक दिली त्यामुळे संतोषच्या डोक्यास जोरात  मार लागल्याने रक्तस्राव होऊन तो जागीच ठार झाला. 

   

Rate Card

हेही वाचा: सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी धम्मविचार आचरणात आणा : विजय गायकवाड

मोटारसायकलच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे.व्हसपेठ ते चडचण रोडचे सध्या काम सुरू अाहे.मुळात सुमार दर्जाचा रस्ता करताना या रस्तावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षा ढाब्यावर बसविली आहे.ठेकेदाराच्या मनाप्रमाणे रस्ता काम सुरू आहे.कामाची रस्त्यावरच वाहने उभी केली जातात.त्यामुळेच हा अपघात झाल्याची चर्चा  घटनास्थळी सुरू होती.उमदी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत्तदेह शवविच्छेदनसाठी जतला पाठवण्यात आला.त्याच्या पश्चात दोन भाऊ,आई व वडील असा परिवार आहेत.

अपघातात दुचाकीचा झालेली आवस्था व मयत संतोष

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.