हिवरे | मेजर सुभेदार सोलनकर यांचे आसाममध्ये हृदय विकाराने निधन |

0

जत,(प्रतिनिधी): हिवरे (ता.जत)येथील भारतीय सैन्यातील मेजर बाळासो ज्ञानु सोलनकर  (वय-45)यांचे आसाममध्ये हृदय विकाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. ते आसाम मध्ये कार्यरत होते. त्यांचे पार्थिव रविवारी रात्री 9.00 वाजता पुणे येथे येणार आहे.अंत्यविधी सोमवारी हिवरे येथे होणार आहे.

हेही वाचा :

Rate Card

उमदीत विजेचा खेंळखडोबा,विजपुरवठा सुरळीत करा,अन्यथा टाळे टोकू

त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा नुकताच सैन्यात भरती झाला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना मेजर पदी बढती मिळाली होती.त्यांच्या अकस्मात निधनाने हिवरे गावात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.