कुडणूर | खूनप्रकरण : तपास जैसेथे | पोलिसांना आरोपी सापडेना : उलटसुलट चर्चा

0

जत,प्रतिनिधी: कुडणूर ता.जत येथे बुधवारी रात्री सिध्दनाथ बाबासो सरगर याचा धारदार शस्ञाने हल्ला करून खून करण्यात आला होता.पोलीसांनी घटनेदिवशी पासून तपास सुरू केला आहे. जत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अरोपीचा शोध घेतला जात आहे. मात्र आरोपी पोलीसाच्या हाताला लागत नाही.लक्ष्मीपुजनाच्या दिवशी झालेल्या खूनाच्या घडनेने कुडणूर सह परिसरात खळबंळ उडाली होती.व्यवसायाने ट्रक्टर चालक असलेल्या सिध्दनाथ यांचा जून्या वैरत्वातून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गावातील टेम्पो चालक प्रमोद तानाजी खांडेकर यांच्याशी सिध्दनाथचे जूना वाद होता.सहा महिन्यापुर्वी त्यांच्यात हाणामारीपर्यत वाद झाला होता.बुधवारी रात्री त्यांच्या वाद झाला.यामुळे सिध्दनाथवर प्रमोद चिडून होता.सिध्दनाथ दुचाकीवरून सरगर येथील घरी जात असताना प्रमोद यांने टेम्पो त्यांच्या पाठीमागे घेऊन गेला.खांडेकर वस्तीनजिक त्याने सिध्दनाथच्या टेम्पो अडवा उभा केला.

हेही वाचा :

हिवरेच्या जवानाचे आसाममध्ये निधन

टेम्पोतून उतरून दुचाकी शेजारी उभा राहिलेल्या सिध्दनाथच्या डोक्यात गाडीतील टॉमी चा जोरदार प्रहार केला.त्यात सिध्दनाथची डोक्याची कवटी फुटल्यागने तो जागीच ठार झाला. त्याला तेथेच टाकत संशियत प्रमोदने टेम्पो घेऊन पलायन केले.जत पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. गुरूवारी प्रमोदचा टेम्पो एमएच-10,झेड-4667 हा जत येथे पोलीसांना आढळूंन आला.पोलीसानी टेम्पो ताब्यात घेतला आहे. संशियत आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत.दरम्यान प्रमोद शिवाय अन्य आरोपी आहेत का? यांचाही शोध घेतला जात आहे.सर्व शक्यता पडळून पाहत आहोत. नेमका खून कशासाठी केला यांचाही तपास सुरू आहे.घटने दिवशी आरोपी पोलीसात  हजर होणार असल्याची माहिती पोलीसांना कुणीतरी दिली होती त्यामुळे पोलीसांचा तपास धिम्या गतीने झाला.परिणामी अरोपी पळूंन जाण्यात यशस्वी झाला असल्याचा नातेवाईकाचा आरोप आहे.

Rate Card

हेही वाचा:

जतेत वाहन अडवून चालकांस लुटले,जनावरा बाजाराजवळची घटना ; सात जणाच्या टोळीचे कृत्य

पोलीसांना घटनेनंतर काही तासात माहिती मिळते.अरोपीच्या वतीने कोनतरी खून केल्याचा फोन करतंय,मात्र अरोपी फरार होईपर्यत पोलीस वाट बघतात.यांचे गौडबंगाल काय अशा चर्चेला उधान आले आहे.खून झाल्यानंतर अरोपी गावातून निंवात पळून जातो.त्यांचा टेम्पो जत शहरात सापडतो पंरतू आरोपी सापडत नाही.त्यामुळे पोलीसाचा तपासावर प्रश्नचिन्ह उभारत आहे.फोन आल्याच्या वेळी पोलिस कुडणूर मध्ये पोहचले  असतेतर अरोपीला पकडण्यात यश आले असते. असे स्थानिक नागरिक सांगतात.तपासात अनभुवी अधिकाऱ्यांची उणीव जाणवते.दरम्यान पोलीसांचे पथके अरोपीचा शोध घेत आहेत.यापलिकडे काहीही माहिती नसल्याचे तपासधिकारी गुंडरे यांनी सांगून फोन बंद केला.

खून केल्यानंतर अरोपी प्रमोद खांडेकर हा जतला येऊन टेम्पो सोडूंन पुढे सोलापुरला गेल्याचे निश्चित झाले आहे.त्यांचा टेम्पो पोलीसांनी सातारा रोड येथील गँरेज समोरून ताब्यात घेतला आहे.प्रमोदच्या माग घेताना पोलीसांना त्याचे सोलापुर मध्ये मोबाईल लोकेशन दाखविले आहे.तेथून पोलीसाची कुणकुण लागल्याने त्यांने परराज्यात पलायन केल्याची चर्चा आहे.दरम्यान तत्पुर्वी सोलापुर मधील एका व्यापाऱ्यांकडून प्रमोदने अडव्हास पैसे घेतल्याचे कळतयं.त्या पैशाच्या आधारे तो पुढे पळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.