उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत येथील मुख्य बाजार पेठेतील संतोष येळमेली यांच्या टीव्ही केबल,झेरॉक्स मशीन तसेच किराणा दुकानाला अचानक लागली. आगीत दुकानातील साहित्याचे सुमारे बारा लाखाचे नुकसान झाले.सुदैवाने जिवीतहानी टळली.
ग्रामपंचायती लगत आठवडा बाजार भरतो.तेथे सोसायटीचे गोडाऊन बांधले आहे.त्यातील काही भाग संतोष येळमेली यांनी भाड्याने घेतला आहे.त्यात टिव्ही केबल,झेराक्स सेंटर व किराणा मालाचे दुकान सुरू आहे.दिवाळी तोंडावर आल्याने किराणा,टिव्ही व झेराक्स मशीन असे साहित्य मोठ्या प्रमाणात भरले होते.त्यामुळे गोडाऊन फुल्ल होते.
शनिवारी सांयकाळी गोडाऊनला अचानक आग लागली व बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात गोडावूनमध्ये असलेले सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग लागल्याचे समजताच काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांनी धाव घेत आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत दुकानास लागलेली आग पाणी मारून आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.मात्र तोपर्यत दुकानातील साहित्य भस्मसात झाले.घटनेचा पंचनामा तलाठी श्री.बागेळी यांनी केला.घटनास्थंळास पोलीस उपनिरिक्षक प्रवीण संपागे यांनी भेट दिली.
दरम्यान कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे त्यांच्या पत्नी संरपंच सौ.वर्षा शिंदे यांनी दुकान जळल्याने उघड्यावर पडलेल्या संतोष ऐळमेली कुटुंबास तातडीने 51 हजार रुपयांची मदत दिली आहे.त्याचबरोबर काही दानसुरांनी ऐळमेली यांना मदत करावी असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
उमदी ता.जत येथे टिव्ही केबल,किराणा दुकानाला लागलेल्या आगीत जळालेले साहित्य
उमदीत ता.जत संतोष येळमेली यांना तातडीने मदतीचा चेक देताना संरपच वर्षा शिंदे व कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे व मान्यवर