जत,प्रतिनिधी : जत कृषी विभागाच्या वतीने झालेल्या जलयुक्त शिवार 2017-18 योजनेची कामे केलेल्या सुशिक्षित बेरोजगार अभियंते,व मक्तेदारांनी लाखो रूपयाची बिले मिळाली नसल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत. ती बिले 31 ऑक्टोबर अखेर द्यावीत अन्यथा 1 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा जत तालुक्यातील अंभियते व मक्तेदारांनी दिला आहे.
कायम दुष्काळी असणाऱ्या जय तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेची कामे मंजूर करण्यात आली होती.तालुक्याचे भुमीपुत्र असणारे सुशिक्षित बेरोजगार अभियंते, व मक्तेदारांनी कोणत्याही उत्पन्नाच्या अपेक्षेविना गतीने कामे केली आहेत.पावसाळा सुरू होण्याअगोदर कामे झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणी साठेल अशा पध्दतीने कामे झाली आहेत. सर्व शासकीय नियमानुसार कामे करूनही शासनाकडून मार्च 2018 पासून बिले मिळालेली नाहीत. कृषी विभागाच्या या कामासाठी या अभियंते व मक्तेदारांनी बिले वेळेत मिळतील म्हणून बँकाची कर्जे,हातउसने कर्जे काढून स्व:ताचे पैसे घालून कामे पुर्ण केली आहेत.मात्र तब्बल आठ महिने झाले तरीही बिले न मिळाल्याने अभिंयते व मक्तेदार अडचणीत सापडले आहेत.बिले न मिळाल्याने घेतलेले पैसे परत देता न आल्याने या सुशिक्षित बेरोजगार अभिंयते व मक्तेदारांच्या गाड्या ओडून नेहण्याइतपत परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने थकलेली बिले द्यावीत अन्यथा उपोषणास बसणार आहोत असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर राहूल घोडके,धैर्यशील चव्हाण,अक्षय पाटील,अक्षय बन्नेनवर,कपिल माने,तुकाराम हिप्परकर आदी अभिंयत्याच्या सह्या आहेत.
Home Uncategorized जलयुक्त शिवार योजनेची तब्बल 8 महिन्यापासून बिले थकली,सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मक्तेदार अडचणीत