जतेत जलयुक्त शिवार योजनेत भष्ट्राचार ; प्रकाश जमदाडे,तालुक्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

0

Rate Card

जत,प्रतिनिधी: जत उपविभागीय कृषी अधिकाऱी कार्यालयाच्यावतीने झालेल्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला आहे. मर्जीतील ठेकेदारांना कामे देऊन अधिकाऱ्यांनी कमाई केल्याचा आरोप माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार बैठकीत केला.

जमदाडे म्हणाले, जतच्या उपविभागीय कार्यालयात जतचे एक अधिकारी आल्यापासून सर्वच कामांना भष्ट्राचाराची लागण झाली आहे. जलयुक्तच्या 14 लाखाच्या कामाला 30 लाखांची जेसीबी मशीन पाहिजे अशा नियमबाह्य अटी घालून भुमीपुत्र ठेकेदारांना डावलले आहे. जलयुक्तची 11 कामे 10 ते 14 लाखापर्यंतची असताना कारण नसताना किचकट अट घालण्याचा उद्योग या अधिकाऱ्यांनी केला आहे.अशा प्रकारची कामे सिंचन विभागाकडूनही तालुक्यात होत आहेत. त्याच्या अशा पद्धतीच्या अटी नाहीत. तालुक्यातील दुष्काळ हटावा म्हणून जिल्हा नियोजनमधून तालुक्याला चार कोटी पेक्षा जास्त निधी मिळाला आहे. त्याचा अशा भ्रष्ट कारभारामुळे दुरूउपयोग झाला आहे. तालुक्यातील ज्या गावात कामे आहेत. त्याच गावातील ठेकेदारांना कामे देंणे गरजेचे असताना हा नियम डावलून तालुक्यातील  एक कृषीसेवक असणाऱ्यांच्या ठेकेदार भावास बेकायदेशीर 26 कामे दिली आहेत. याशिवाय कृषी विभागातील अन्य अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना अशी कामे देऊन तालुक्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने लाखो रूपये मिळविले आहेत. उपविभागातील अनेक अधिकारी लक्ष्मीदर्शनाने ठेकेदार बनल्याचा आरोप जमदाडे यांनी यावेळी केला. विभागीय कार्यालयानजिक जमिनीत या अधिकाऱ्यांने बेकायदेशीरपणे अगोदर कामे व नंतर टेंडर काढण्याचे प्रकार केला आहे. त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी आम्ही तक्रार केली आहे.

जत तालुक्यातील सर्वाधिंक जलयुक्त शिवार योजनेतून मोठ्या संख्येने कामे झाली आहेत. सर्वच कामे नियमानुसार आहेत. मुळात झालेल्या कामाची 16 कोटीची बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे भष्ट्राचार होण्याचा प्रश्नच नाही.पंचायत समितीत राजकीय विरोध केल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप जमदाडे यांनी केले आहेत.यापुर्वी कृषी विभागाच्या चांगल्या कामाबद्दल पंचायत समितीतच अभिंनदनाचा ठराव घेतला होता. तालुक्यातील कोणत्याही कामात भष्ट्राचार झाला नाही.त्यामुळे कोणत्याही चौकशीस आम्ही तयार आहोत.
-.कांताप्पा खोत, उपविभागीय कृषी अधिकारी, जत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.