दिनराज वाघमारे यांच्या ‘वैभवशाली जत’ पुस्तकाचे 25 रोजी प्रकाशन

0

जत,(प्रतिनिधी);पत्रकार दिनराज वाघमारे यांच्या जत तालुक्याचा समग्र इतिहास असलेल्या ‘वैभवशाली जत’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार दि. 25 ऑक्टोबर रोजी येथील साईप्रकाश मंगल कार्यालय येथे बालगाव (ता. जत) येथील श्री गुरुदेव आश्रमाचे प.पु. श्री अमृतानंद स्वामी, श्रीमंत कीर्तीमालिनीराजे डफळे, श्रीमंत ज्योत्स्नाराजे अनिलराजे डफळे, श्रीमंत शार्दुलसिंहराजे अनिलराजे डफळे यांच्याहस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार विलासराव जगताप असणार आहेत.पत्रकार श्री. वाघमारे यांनी जत तालुक्यातील पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळांचा धांडोळा घेऊन सचित्र असा इतिहास ग्रंथबद्ध केला आहे. यातून जतसारख्या सध्याच्या दुष्काळी तालुक्याचा पण एकेकाळी वैभवप्राप्त असलेल्या तालुक्याचे वैभव लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासकार, अभ्यासकांना आणि जतच्या भूमिपुत्रांसाठी हे पुस्तक उपयोगाचे ठरणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, काँग्रेसचे नेते विक्रमसिंह सावंत, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, जि.प. चे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मणगौडा रविपाटील, डॉ. रवींद्र आरळी, अ‍ॅड. प्रभाकर जाधव, मन्सूर खतीब, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, तहसीलदार अभिजीत पाटील (माळशिरस),उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, दैनिक पुढारीचे उपसंपादक गणपत पवार (सांगली), माजी आमदार अ‍ॅड. जयंत सोहनी, माजी आमदार मधुकर कांबळे उपस्थित राहणार आहेत.
या समारंभाला पं.स.सदस्य सुशिला तावंशी, उपसभापती शिवाजी शिंदे, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवार, जि.प.सदस्य सरदार पाटील, स्नेहलता जाधव, दिग्विजय चव्हाण, अप्पासाहेब नामद, नाथा पाटील, श्रीदेवी जावीर, शिवाजी ताड, आप्पाराया बिराजदार, चंद्रशेखर गोब्बी, भूपेंद्र कांबळे, स्वप्निल शिंदे, टिमू एडके, इकबाल गवंडी, भारती जाधव, वनिता साळे, अभिजीत चव्हाण, परशुराम चव्हाण, संजय कांबळे, मच्छिंद्र वाघमोडे, चंद्रकांत गुडोडगी, सुजय शिंदे, अशोक बन्नेनवर, आर. जी. पवार, अजितकुमार पाटील, बसवराज पाटील, दिनकर पतंगे, प्रकाश देवकुळे, सलीम गवंडी, पोपट ढोकळे- जाधव, महादेव स्वामी, सुनील पोतदार, डॉ. श्रीकांत कोकरे, मच्छिंद्र ऐनापुरे, श्रीकृष्ण पाटील, तानाजी जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.