कोतेबोंबलाद,वार्ताहर: कोतेबोबलाद ता.जत येथील दुकानदारांना खंडणी मागणाऱ्या खंडणीखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेला बंद अखेर आ.विलासराव जगताप यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आला.
कोतेबोंबलाद येथील काही व्यापाऱ्यांना दमदाटी करून खंडनी मागितल्याप्रकरणी उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गाव बंद ठेवण्यात आले होते. सोमवारी तिसऱ्या दिवशी आ.जगताप यांनी कोतेबोबलाद येथे पदाधिकारी, व्यापारी, नागरिंक यांची बैठक घेतली. खंडणीखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल.असे प्रकार निंदनीय आहे. गावातील व्यापारी, नागरिकांच्या मी कायम पाठीशी अाहे.यापुढे असा कोणताही प्रकार यापुढे घडू नये यासाठी पोलिंसाना कारवाई करण्याचे आदेश यावेळी आ.जगताप यांनी दिले आहेत.
दरम्यान आ.जगताप यांच्या आश्वासन मुळे व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला आहे. सर्व व्यवहार पुर्वरत सुरू झाले आहेत.
कोतेबोबलाद येथील घटनेशी आमचा संबध नाही: आ.जगताप
जत,प्रतिनिधी: कोतेबोंबलाद हे माझे गाव आहे.मात्र मागील चाळीस वर्षे मी गावामध्ये राहत नाही.गावामध्ये खंडणीवरून जे आरोप होत आहेत. त्यांच्याशी आपला काढीचाही संबध नाही.
कॉग्रेस तालुकाध्यक्षाचे आप्पाराया बिराजदार यांचे संतूलन बिघडल्यामुळे फालतू आरोप करत सुटले आहेत. अशी टिका आ.विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत केली.
आ.जगताप म्हणाले,बिराजदार हे बेताल वक्तव्य करून अनेक मुक्ताफळे उधळत आहेत.तालुक्यात काहीही झाले तरी त्याचे खापर आमदार व भाजपवर फोडण्याचा एककलमी कार्यक्रम कॉग्रेसने सुरू केला आहे. कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष बिराजदार हे विक्रम सांवत यांच्या खाल्या मिठाला जागत आहेत.त्यामुळे संवग प्रसिध्दीसाठी बेताल वक्तव्य करत आहेत.
|