जत पंचायत समिती सभापतीपदी सुशिला तावशी
जत,प्रतिनिधी: जत पंचायत समितीच्या सभापती पदी सौ.सुशिला शिंवाप्पा तांवशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जतच्या मावळत्या सभापती मंगलताई जमदाडे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली.यात भाजप,वंसतदादा आघाडी, जनसुराज्य अशी युक्ती झाली आहे.नुतन सभापती तावशी यांचा सत्कार आ.विलासराव जगताप यांनी केला.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, सभापती तम्माणगोंडा रवीपाटील,शिवाजीराव ताड,उपसभापती शिवाजी शिंदे,
आप्पासाहेब नामद,शिवाप्पा तावशी,नगरसेवक उमेश सांवत उपस्थित होते.