जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मल्लाळ येथील शेतकरी गोरख हणमंत काळे (वय-39)यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली, शुक्रवारी दुपारी तीन वाजता घटना घडली.
जतपासून तीन किलोमीटर दक्षिणेस मल्लाळ हे गाव आहे.गोरख काळे या शेतकऱ्यांने द्राक्षबागेसाठी कर्ज काढले होते. विकास सोसायटीचे कर्ज काढले आहे. काही मित्रांकडून हात उसने पैसेही घेतले आहेत. त्यांच्यावर एकूण चार लाखाचे कर्ज होते.
सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेती वाया गेली आहे. बागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड झाली नव्हती. त्या विवंचनेतून त्यांनी शुक्रवारी दुपारी द्राक्ष बागेवर फवारायचे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याबाबत जत पोलीसांत नोंद झाली आहे.दरम्यान पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी मुत्यूला कंटाळत अाहेत.शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा.व शेतकऱ्यांना मदत द्यावी अन्यथा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याची मालिका जत तालुक्यात भविष्यात दिसतील.