तीन चिमुरड्यांसह महिलेची आत्महत्या जतेतील ह्रदय हेलावणारी घटना : पाणीपुरवठा विहिरीत मध्यंतरीच्या सुमारास मुलांसह उडी टाकली

0

जत,प्रतिनिधी:जत शहरातील राधिका सुभाष कोळी(वय-32) या महिलेने कौंटुंबिक वादाला वैतागून तिंच्या तीन चिमुरड्यां मुलासह विहिरीत उडी टाकून जीवन यात्रा संपविल्याची ह्रदय हेलावणारे घटना घडली.प्रज्वल (वय-5),आराध्या(वय-5),व यश(वय-4 महिने) अशी मयत चिमुरड्यांची नावे आहेत.गुरूवारी दसऱ्यांचे शिलांगणाचे सोने लुटण्यात शहर गर्द असताना ही घडली आहे. महिला,तीन्ही चिमुरड्यांसह चार जणांनी जीवन यात्रा संपविल्याने तालुक्यात खळबंळ उडाली आहे. मयत राधिकाचे माहेर व सासरच्या नातेवाईकांत या घटनेवरून जोरदार वादावादी झाली.सायकांळी उशिरापर्यत वादामुळे मृत्तदेह ग्रामीण रुग्णालयांत ठेवण्यात आले होते.

अधिक माहिती अशी, शहरातील मंगळवार पेठेतील कोळीगल्ली येथे सुभाष शेखर कोळी यांचे कुटुंबिय राहते.शेखर कोळी हे जत आगारात अधिकारी आहेत.त्यांचा मुलगा सुभाष हा सेंट्रीगचे काम करतो.गुरूवारी दसऱ्याचा सणामुळे तो घरीच होता.त्या दिवशी सुभाष व त्यांची पत्नी राधिका यांच्यात किरकोळ कारणावरून जोरदार भांडण झाले होते.भांडण झाल्यानंतर सुभाष घरातून निघून गेला. यापुर्वीही सतत भांडणे होत असल्याने वैतागलेली राधिका तिची मुले प्रज्वल, आराध्या,व चार महिन्याच्या यशसह घराबाहेर पडले.रात्री नऊच्या सुमारास ती मुलासह घरातून मुलांना घेऊन बाहेर पडली.शहरातील हनुमान मंदिरापासून पुढे पारंडी ताड्या मार्गे यल्लम्मा देवीकडे जाणाऱ्या रस्त्याने ती मंदिराकडे गेली.राधिकाच्या घरापासून मंदिर दोन किलोमीटर वर आहे.पारधी तांड्यातील काही लोंकानी राधिकाची विचारफुस केली,तेव्हा तिने मावशीकडे जात असल्याचे सांगितले. रात्री या मार्गावर कोणीही सहसा फिरकत नाही.तरीही राधिका धाडसाने मंदिरापर्यत पोहचली. मनाशी आत्महत्येचा विचार केलेल्या राधिकांने क्षणाचाही दुसरा विचार न करता थेट विहिरीत आपल्या तिन्ही बालकांना घेऊन उडी घेतली.
जत शहरातील दक्षिण बाजूला प्रसिध्द श्री.यल्लम्मा देवीचे मंदिर आहे.मंदिराच्या दक्षिण बाजूला शहराला पाणी पुरवठा करणारी मोठी विहिर आहे.विहीर सुमारे अडीशे फुट खोल आहे.या विहिरीत राधिकाने आपल्या  तिन्ही बाळांना घेऊन जीवनयात्रा संपविली.शुक्रवारी सकाळी नगरसेवक नामदेव काळे फिरण्यासाठी मदिंराकडे गेले होते. पाणी पुरवठा विहिरीची पाहणी करत असताना त्यांना बालकाचा मृत्तदेह पाण्यावर तरंगत असताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडीस आला.हा आत्महत्येचा प्रकार उघडीस आल्यानंतर नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिर खोल व पाणी असल्याने मोठी अडचण होती.त्याशिवाय विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्याही नव्हत्या.पोलीस व नगरपालिकेने तातडीने क्रेन मागविला,क्रेनच्या सहाय्याने अनिल चव्हाण, दिपक चव्हाण, किरण चव्हाण, या तरुणांसह सातजण विहरीत उतरले.चार महिन्याचा बालक यश यांचा मृत्तदेह पाण्यावर तरंगत होता.प्रथम त्यांचा मृत्तदेह दोरीला झोळी लावून बाहेर काढला.

Rate Card

पाण्यामुळे मृत्तदेह काढताना अडचणी
विहिरीत सध्या तिप्पेहळ्ळी तलावातून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी सोडल्याने पाणी अधिक होते.त्यामुळे बाकी जणांचा शोध घेताना अडचणी येत होत्या. बराच वेळ मृत्तदेह सापडत नव्हते. मात्र मदत कार्य करणाऱ्या जिद्दी तरूणांनी राधिकांचा मृत्तदेह शाधून काढला.राधिका नंतर प्रज्वल व आराध्याचे मृत्तदेह हाती लागले.सर्व मृतदेह क्रेन व बाजूला एक दोरी बांधून विहीरी बाहेर काढण्यात आले.नातेवाईकांनी आक्रोश सुरू होता.त्यांचे आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले.नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तळहाताप्रमाणे असणारे चिमुकल्याचे मृत्तदेह बघून उपस्थित सर्व हळहळे,अनेकांना बोलताना शंब्द फुटत नव्हते.इतके दु:ख झाले होते.
तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह क्रेन, दोरीच्या साह्याने काढण्यात आले सकाळी साडेसहाच्या दरम्यान तरगंणाऱ्या यशचा मृत्तदेह बाहेर काढण्यात आला. त्यांनतर तब्बल चार तासानंतर नागरिंक, पोलीस अधिकारी,कर्मचारी पालिकेचे कर्मचाऱ्यांनी सर्व मृत्तदेह बाहेर काढले.विहिरीची रचना जुन्या पध्दतीने असल्याने त्याला संरक्षक कठड्यामुळे कुठेही पायऱ्या नाहीत.त्यामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या.मात्र धाडसी तरूण,पोलीस अधिकारी,कर्मचारी,नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी ही मोहिम फत्ते केली.
राधिकाचे माहेर कर्नाटकातील देवरनिंबर्गी आहे.आत्महत्येची माहिती मिळताच तेथील मोठ्या संख्येने नातेवाईक जत ग्रामीण रुग्णालयांत आले होते. राधिका,प्रज्वल, आराध्या,यश यांचे मृत्तदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. राधिकांची आई पुणे येथे मुलाकडे गेली होती.तिला येण्यास वेळ झाला.तत्पुर्वी सासर व माहेरच्या लोकांत रूग्णालय परिसरात वादावादी झाली.हाणामारीचेही प्रकार घडले.रूग्णालय परिसरीत नातेवाईक, नागरिकांची प्रंचड गर्दी केली होती. राधिकांची आई आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.
कोळी कुंटुंबावर मोठा आघात झाला आहे. सुभाष कोळी यांच्या बहिणीने दहा दिवसापुर्वी जाळून घेऊन आत्महत्या केली आहे. या दु:खाचा डोंगर पुढे असतानाच राधिकांने आपल्या तीन मुलांना घेऊन जीवनयात्रा संपविली. अगदी दहा दिवसात कुंटुबीतील पाचजणांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती.

राधिकाच्या नातेवाईकांचा रुद्रआवतार पाहून कोळी कुंटुबिये गायब
घटनेनंतर शेखर कोळी,राधिकाचा पती सुभाष व अन्य कुटुंबिय पसार झाले.राधिकांच्या माहेरच्या नातेवाईकांचा रुद्रआवतार पाहून त्यांची भंबेरी उडाली होती.ते रात्री उशिरापर्यत मृत्तदेहाजवळ आले नव्हते.पोलीस त्यांच्याशी फोन द्वारे संपर्क करत होते.मात्र ते फिरकले नाहीत.

नगरपालिकेवर गुन्हा दाखल करा :उमेश सांवत
श्री.यल्लम्मा देवीची विहिर नगरपालिकेची आहे.या ठिकाणी मंदिर असल्याने कायम नागरिकांची गर्दी असते.कोणताही अनुसुचित प्रकार घडू शकतो.त्यामुळे विहिरीवर सुरक्षेसाठी संरक्षक जाळी बसविण्याची आम्ही वारवांर मागणी केली आहे. त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नाहक चार  जीव गमवाले आहेत.पाणी पुरवठ्याच्या या विहिरीला यमदूत होण्यास नगरपालिका कारणीभूत आहे.पालिकेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नगरसेवक उमेश सांवत यांनी केली आहे.

नगरपालिकेला शहाणपण
यल्लम्मा देवी लगतच्या विहिरीवर जाळी बसविण्याची यापुर्वी गरज होती.अगदी छोट्या-छोटया गावात अशा विहिरीवर जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.मात्र नगरिपालिकेला येथे जाळी बसविण्यासाठी चार जीव जाण्याची वाट पहावी लागली.आता नगरपालिकेकडून जाळी बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

यल्लम्मा देवी लगतच्या विहिरीजवळ जमलेली गर्दी,रुग्णालयात नातेवाईक व नागरिंक प्रंचड संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.