संख | खूनप्रकरणी संशियतास 22 ऑक्टोबर पर्यत कस्टडी

0

संख,वार्ताहर: जत तालुक्यातील संख येथील तरूण सिध्दगोंडा परगोडा बिराजदार (वय-25) यांच्या खून प्रकरणातील संशियत भरमाप्पा बिरापा करगजी याला उमदी पोलिसानी बुधवारी जत न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला 22 ऑक्टोबरपर्यत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले.
संख येथे सोमवारी मध्यरात्री अनैतिक संबधाच्या संशयावरून कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून खूनाचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडीस आला. उमदी पोलीसांनी काही तासात संशयिताला जेरबंद केले.सशयिंताच्या पत्नीशी सिध्दगोंडा यांचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून मध्यंरात्री त्याने खून केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.दरम्यान मंगळवारी सायकांळी आरोपीला घटनक्रम तपासणीसाठी घटनास्थंळी आणण्यात आले होते. संशियत आरोपीने खूनासाठी वापरलेली कुऱ्हाड त्यांच्या बंद बोअरवेल्समध्ये टाकली आहे. बोअरवेल्स सुमारे सातशे फुट खोल असल्याने पोलीसांना मंगळवारी कुऱ्हाड काढता आली नाही.बोअरवेल मधील मोटार काढण्याच्या मशीन कडून कुऱ्हाड काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.दरम्यान अरोपीची कपडे व अन्य कोन साथीदार आहे का यांचा तपास पोलीस करत आहेत.अधिक तपास सा.पोलीस निरिक्षक भगवान शिंदे करत आहेत.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.