माडग्याळमध्ये एकास डेंग्यूची लागण | सनमडी, व्हसपेठ, गुड्डापूर मध्ये डेंग्यू, चिकनगुनिया रुग्ण वाढले

0

जत,प्रतिनिधी: माडग्याळ, सनमडी, व्हसपेठ, गुड्डापूर परिसरीत डेंग्यू,चिकनगुनिया आजाराने थैमान घातले अाहे. माडग्याळमधील डॉ.महादेव जाधव(वय-45)यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्याशिवाय परिसरातील सुमारे शंभरावर रुग्ण सरकारी,खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. परिसरातील घरटी,तापाचे रुग्ण आढळत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. घाणीचे सामाज्र,गटारी अडून बनलेली डबकी यामुळे मोठ्या प्रमाणात डांसाची उत्पती झाली आहे. चारी गावातील ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर उठले आहे.
सोरडी येथील डॉ.महादेव जाधव यांचा माडग्याळ येथे खाजगी दवाखाना आहे.ताप कमी होत नसल्याने त्यांनी जत येथे तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.जत येथील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान माडग्याळ गावात चिकनगुनिया, डेंग्यूचा गेल्या महिन्यापासून रुग्ण सापडत आहेत. याबाबतचे वृत्त येताच आरोग्य विभाग जाग होत आहे. इतरवेळी कारवाई शुन्य असते.गतवेळी रुग्णाची संख्या वाढल्याने घराची तपासणी केली होती.त्यात साठ घरात डासांच्या आळ्या सापडल्या होत्या.औषध व धुर फवारणी केली आहे. मात्र पुन्हा साथीच्या आजाराने रुग्ण वाढल्याने भिती निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी स्वच्छता होत नाही.त्यामुळे घाणीचे सामाज्र वाढले आहे.
दरम्यान सनमडी, गुड्डापूर, व्हसपेठ येथेही डेंगू,चिकनगुनिया आजाराचे रुग्ण आढळत आहेत. तेथेही ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. संबधित विभागाकडे तक्रारी करूनही ते दखल घेत नसल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.