जत पं स.22 ला सभापती निवड | कविता खोत, सुंनदा तावशी रस्सीखेच
जत,प्रतिनिधी:जत पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम तहसीलदारांनी जाहिर केला. सोमवार, 22 ऑक्टोंबर रोजी सभापती निवडीसाठी पंचायत समितीची विषेश सभा बोलावण्यात आली आहे. सभापती मंगल जमदाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दिला होता. राजीनामा मंजूर करून अध्यक्षांनी सभापतीचा कार्यभार उपसभापती शिवाजी शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. त्यामुळे नुतन सभापती निवड केली जात आहे. तहसीलदार सचीन पाटील यांनी सोमवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सभापती निवडीसाठी विशेष सभा बोलावली आहे. सकाळी 11 वाजता नामनिर्देषपत्र सादर करणे,12:30 वाजता छाननी व 1 वाजता अर्ज माघारीची वेळ आहे. आवश्यकता भासल्यास दुपारी दोन वाजता मतदान होईल. सभागृहात भाजप- राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे उपसभापतीपद कायम ठेवण्यात आले आहे. भाजपमधील कविता कांताप्पा खोत व महानंदा तावशी यांची नावे सभापतीपदाच्या शर्यंतीत आहेत.दोघांनी मोर्चेबांधणी केली आहे. भाजप नेते आमदार विलासराव जगताप कोणाच्या पारड्याच सभापती टाकतात,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
