व्हसपेठ-आंसगीजत रस्त्याच्या निकृष्ठ कामाचा पदाधिकाऱ्यांकडून पंचनामा

0
9

जत,प्रतिनिधी : व्हसपेठ-आंसगी(जत)रस्त्याच्या निकृष्ठ रस्त्याच्या पंचनामा जिल्हा परिषद सदस्य रेखा बागेळी व पंचायत समिती सदस्य कविता खोत यांनी केला.
बांधकाम विभागाचे उपअंभियता श्री.शिंदे यांची खरडपट्टी करत निकृष्ठ काम होत असताना तुम्ही काय करत होता.किती दिवस रस्ता टिकेल.त्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी कोणाची,नियमानुसार काम झाले आहे काय?आदी प्रश्नाचा भडीमार त्यांनी केला.दोन महिन्यात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काम सुरू झाल्यापासून आम्ही यांची माहिती संबधित विभागाला दिली आहे. तरीही शासनाचे निकष धाब्यावर बसवून रस्त्याचे दर्जाहीन काम झाले आहे. यांची तक्रार आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे यावेळी बागेळी व खोत यांनी सांगितले.

उपअंभियता शिंदे यांना निकृष्ठ रस्ता कामाचा जाब विचारताना जि.प.सदस्या रेखा बागेळी, पं.स.सदस्य कविता खोत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here