जत महसूल विभागातील गंबरगंड अधिकारी, तलाठ्याची इडीकडून चौकशी करा

0

जत,प्रतिनिधी:जत महसूल विभागाकडून होत असलेल्या भष्ट्राचाराचा बुरखा आमसभेत फाडल्यानंतर जत तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मंडलअधिकारी,तलाठी रडारवर आले आहेत.काही हाजाराचा पगार असलेल्या महसूलच्या अधिकारी, तलाठ्याची मालमत्ता करोडोची कशी झाली यांची तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे महसूलच्या या अधिकारी, तलाठ्याची इडीकडून चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

Rate Card

जत तालुक्यात प्रांत,जत तहसीलदार,संख अप्पर तहसील,मंडल विभाग,व तलाठी कार्यालयातून महसूल विभागाचा कारभार चालतो.यात मोठा गफला होत आहे. सर्वच विभागात नित्याने नागरिकांची पिळवणूक होत आहे.तलाठी पातळीवरील कर्मचारी दररोज हाजारो रूपयाची वरकमाई करत असल्याचे आरोप आमसभेत करण्यात आले. कॉग्रेसचे नेते कुंडलिक दुधाळ यांनी कसा चालतो महसूलच्या वरकमाईचा कारभार यांचा लेखाजोखा आमसभेत आमदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे मांडल्यानंतर महसूल विभागातील वास्तव समोर आले. सामान्य नागरिकांचे किती हाल होत असेल यांची कल्पना अंगावर शहारे आणणारी आहे. या विभागात पंचवीस  हाजारापर्यत पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तालुक्यात करोडोची मालमत्ता जमवली आहेत.यात काळेभेरे निश्चित आहे. त्यामुळे जत महसूल प्रशासनात अनेक वर्षापासून ठिय्या मांडलेल्या तलाठी,अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची इडीकडून चौकशी करून त्यांच्या मालमत्तेवर टांच आणावी तरचं भविष्यात असे प्रकार टाळणे शक्य आहे. अन्यथा बैठकीतील चर्चेवर काही दिवस गुऱ्हाळ होईल.व पुन्हा मागे तसे पुढे सुरू राहणार आहे.

जतच्या महसूल विभागातील अधिकारी वाळू तस्करी,सामान्य जनतेच्या कामासाठी कशी लूट करतात.यांचे अनेक पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे.त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी यापुढे पाठपुरावा करणार आहे.

कुंडलिक दुधाळ, कॉग्रेस नेते

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.