बेंळोडगी ते भिवर्गी फाटा रस्ता बनला मुत्यूचा सापळा

0

करजगी,वार्ताहर: बेळोंडगी ते भिवर्गी फाटा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबराचे अवषेश उरले आहेत.रस्ता मुत्यूचा सापळा बनला आहे. खड्ड्यामुळे नित्याचे छोटे-मोठे अपघात घडत आहेत.

परिणामी पडलेल्या खड्ड्यात रिमझिम पावसाने डबकी बनली आहेत.
बेंळोडगी ते बोर्गी फाटा,करजगी ते भिवर्गी असा हा रस्ता आहे.सिमावर्ती असणाऱ्या या रस्त्याची दुरूस्ती यापुर्वी होणे गरजेचे होते. मात्र रस्त्यावरील डांबरीकरण नामशेष होण्याची वेळ आली तरीही दुरूस्तीसाठी संबधित विभागाचे लक्ष नाही.अगदी दुर्लक्षीत राहिलेल्या या भागातील रस्तेही व्यवस्थित नाहीत.त्यामुळे दळवळण ठप्प झाले आहे.बेंळोडगी ते भिवर्गी फाटा हाही महत्वाचा रस्ता आहे.सध्या या रस्त्यावर मोजता येत नाहीत एवढे खड्डे पडले आहेत.खड्ड्याचा खेल तीन फुटापर्यत वाढला आहे. त्यात नुकत्याच झाल्याने रिमझिम पावसाने पाणी साटले आहे.त्यामुह खड्डे,डबके युक्त रस्त्याने या भागातील नागरिकांना जावे लागत आहे. संबधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

Rate Card

बेंळोडगी ते भिवर्गी फाटा रस्त्याची झालेली दुरावस्था

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.