गुगवाड येथे मटका अड्ड्यावर छापा,सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त : चार संशियत ताब्यात,दोन फरार

0

जत,प्रतिनिधी: जत पोलिस ठाणे हद्दीतील गुगवाड येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या दोन मटका अड्ड्यावर जिल्हा पोलिस प्रमुखाच्या विशेष पथकाने छापा टाकून चार संशियताना रंगेहाथ पकडत सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.बुधवारी सायकांळी गुगवाड गावात हा छापा टाकण्यात आला. याप्रकरणी एका छाप्यात अमित केरीपाळी,संजय तुकाराम ऐवळे, पुंडलिक सिद्राम मांग यांना अटक केली.मटका बुकी पठाण फरार झाला आहे.त्यांच्याकडून 94 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दुसऱ्या छाप्यात मल्लिकार्जुन अंदानी यास अटक केली आहे. तर सिकंदर जमादार,रा. कुपवाड हा मटका बुकी फरार झाला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम,मोबाईल,मटक्याचे तक्ते असा 20 हजार 425 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.  जत तालुक्यातील सुरू असलेल्या मटका,जूगार सारख्या अवैद्य धंद्याच्या तक्रारी पोलिस प्रमुखाच्या कानावर गेल्या आहेत.त्या पाश्वभूमीवर विशेष पोलिस पथकाकडून तालुक्यात छापामारी सुरू आहे. बुधवारी गुगवाड येथे मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.गुगवाड येथे मोठ्या प्रमाणात मटका सुरू असल्याची माहिती विशेष पोलिस पथकास मिळाली होती.पथकाने गुरूवारी सायंकाळी छापा टाकला.याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.