चित्रपट “ होम स्वीट होम ,” स्वप्नांचे घर कि घराचे स्वप्न ” ,,,,,,

0

     घर, एक खोली, दोन खोल्या, चाळी मधील घर, त्यापेक्षा अधिक सुरेख घर,,  असे अनेक प्रकारची आणि विविध सुखसोयी असलेलं घर घेण हे सर्व सामान्य माणसाचे स्वप्न असते, घराविषयी माया, आपुलकी हि तेथे राहिल्याने वाढते, आणि ते आपल्यासाठी एक सुंदर घर बनून रहाते,,,, अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित होम स्वीट होम ची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शन कंपनी प्रा. ली. ने केली असून प्रस्तुती प्रोअकटिव्ह ची आहे. निर्माते हेमंत रुपरेल, रणजीत ठाकूर हे असून प्रस्तुतकर्ते आकाश पेंढारकर विनोद सातव हे आहेत. कार्यकारी निर्माते नितीन प्रकाश वैद्य हे असून दिग्दर्शन ऋषिकेश जोशी यांनी केल आहे. कथाकल्पना ऋषिकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची असून पटकथा ऋषिकेश जोशी, वैभव जोशी यांनी तयार केली आहे, संवाद लेखन मुग्धा गोडबोले याचं आहे, छायाचित्रण रीजू दास संकलन जयंत जठार यांचे आहे. संगीत नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी दिले असून या मध्ये रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, ऋषिकेश जोशी, विभावरी देशपांडे, सुमित राघवन, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख या कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत.

       हि कथा आहे श्यामल आणि विद्याधर महाजन या मध्यमवर्गीय कुटुंबाची, चिरंतन निवास नावाच्या सोसायटी मध्ये हे कुटुंब महाजन यांच्या बहिणीची मुलगी देविका हिच्या समवेत रहात असतात, महाजन यांच्या ओळखीचे एक मित्र सोपान शिंदे हे एक इस्टेट एजंट असतात, लोकांना घरे मिळवून देणे हा त्यांचा व्यवसाय असतो, एक दिवस त्यांना शोधत एक कुटुंब महाजन यांच्या घरी येते आणि घराची पाहणी करते आणि हे घर आम्हाला आवडले असे सांगून घर आपण विकत घेण्यास तयार आहोत हे सांगतात, त्यावेळी श्यामल महाजन यांना कळते कि आपल्या घराची किमंत साडेतीन कोटी आहे, आणि मग त्यांच्या मनांत हे घर विकून दुसरीकडे नवीन घरात राहण्यास जावे असे वाटायला लागते. आपला विचार ते महाजन यांच्याकडे बोलून दाखवतात पण विद्याधर महाजन यांना ते पटत नाही, त्यांच्या सोसायटी मधील सावंत दुसरीकडे मोठया सोसायटीत राहायला गेलेले असतात, त्याठिकाणी सर्व सुखसोयी असतात, हे बघून श्यामल यांच्या मनातील घर घेण्याचा विचार पुन्हा उचल खातो पुन्हा श्यामल आणि विद्याधर यांच्यात मतभेद होतात, आणि एक दिवस विद्याधर जागा विकूया असे ठरवून टाकतात आणि सोपान शिंदे यांना बोलावण्यात येते, आणि मग पुढे काय होते ? त्यांचे घर विकले जाते का ? कोण घेते महाजन यांचे घर ? नक्की नेमके काय होते ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील.

      घर घेण हे आपले स्वप्न असते आणि घराचे सुद्धा एक स्वप्न असते, घर म्हणजे फक्त दोन खिडक्या आणि दारे नाहीत, पूर्वेकडील उन आणि पश्चिमेचा वारा घेत घराला तोरण बांधून संसार थाटायचा असतो, बाहेरच्या ऋतू पेक्षा घरामधले ऋतू हे अधिक महत्वाचे असतात, शेवटी घर सुद्धा आपल्या कुटुंबाचा एक सदस्य असते. घर म्हंटल कि आपला जीव सुद्धा त्यात अडकलेला असतो. घर आपल जरी असले तरी त्यात आपण तुझ माझ करीत असतो. भांडीकुंडी, फर्निचर मध्ये सुद्धा आपली नाती जुळलेली असतात ह्या सर्वांच्यावर सिनेमा वेगळ्या पद्धतीने भाष्य करतो.  

Rate Card

      विद्याधर महाजन { मोहन जोशी }, श्यामल { रीमा }, यांनी मध्यमवर्गीय कुटुंबवत्सल व्यक्तिरेखा मनापासून साकारलेल्या आहेत. त्यांना देविका [ स्पृहा जोशी ], सोपान { ऋषिकेश जोशी }, सुमन { विभावरी देशपांडे }, सुमित राघवन, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख, यांची साथ उत्तम लाभली आहे. रीजू दास यांचे छायाचित्रण ठीक आहे. नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांच्या संगीतात गोडवा आहे. एकंदरीत सिनेमा  ठीक आहे. एकदा गृहप्रवेश करून ठरवा कि स्वप्नांचे घर आहे कि घराचे स्वप्न आहे.   

{  स्टार  अडीच  }      

दीनानाथ घारपुरे { मनोरंजन प्रतिनिधी } ९९३०११२९९७

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.