जतच्या कृषी प्रक्षेत्रावर जलयुक्त शिवार योजनेतून जलसंवर्धनाचा अविष्कार

0
3

जत,प्रतिनिधी:जत शहरातील विभागीय कृषी कार्यालयालगतच्या कृषी विभागाच्या शेतीत जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या जलसंधारणच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले आहे.शासनाच्या योजनेतून जलसंवर्धनाचा अविष्कार येथे पाह्याला मिळत आहे.

गत अनेक वर्षापासून वापराविना पडून आलेली कृषी विभागाची ही जमिनीचे भाग्य खुलले आहे.जतचे सुपुत्र असलेले विभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत यांनी पुढाकार घेत स्व:ता समोर उभे राहत या क्षारयुक्त जमिनीची स्वच्छता,दुरूस्ती केली आहे.जलयुक्त शिवार योजनेतून नालाबांध,खोलीकरण,बांधबंधिस्त,शेततलाव आदी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसात तालुक्यात पडलेल्या पाऊसाने या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पाणी अडून मुरविण्यात यश मिळाले आहे.येथील सर्व क्षेत्रावर विभागवार पिकाची लागवड करून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देणारी शेती बहरणार आहे. त्यासाठी कृषी अधिकारी खोत यांची टीम कामाला लागली आहे. त्यांच्या प्रयत्नाला निसर्गाने पहिली साथ दिल्याने त्यांच्या विश्वास दुणावला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे किड व्यवस्थापन,उत्पादन वाढ,पिकाची लागवड,खताचा वापर,नैसर्गिक शेती, आदी प्रकारचे मार्गदर्शन पुढील वर्षापासून मिळणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

जत शहरातील कृषी विभागाच्या कृषी प्रक्षेत्रावर बुधवारी झालेल्या पावसाने पाणी अडविण्यात यश मिळाले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here