माडग्याळ,वार्ताहर:जतच्या नागरिकांनी श्रमदानातून श्रमाचे चिज होत आहे. तालुक्यात कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार, पाणी,नाम फाऊंडेेनच्या वतीने जलसंधारणात क्रांती घडविली आहे.असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले.जत तालुक्यातील कुलाळवाडी येथे पाणीफौंडेशनने व कृषिविभाग यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या आणि पहिल्याच पावसात पाण्याने भरलेल्या नाला ब्लडींगमधील पाण्याचे पूजन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषिअधिकारी डॉ.कांताप्पा खोत, संभाजी सावंत, जि.प सदस्य सरदार पाटील, विठ्ठल निकम,विष्णू चव्हाण, बाबासाहेब गायकवाड, सरपंच बजरंग कुलाळ, शिवानंद हाक्के, सरपंच बजरंग कुलाळ,कृषिपर्यवेक्षक बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते.
जगताप म्हणाले,तालुक्यात यापुढे पडणाऱ्या पाण्याचा ठेंबन् ठेब अडविला जाणार आहे.यामुळे गावे पाणीदार होणार आहेत. या कामात ग्रामस्थांनी,अधिकाऱ्यांनी जीव लावला होता.त्याचे फलित येत्या काही दिवसात दिसेल.सारख्या दुष्काळी भागात जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी जलसंधारणाची चांगली केली आहेत.
असेही शेवटी आ.जगताप म्हणाले.
जत तालुक्यात कुलाळवाडी गावाचा पाणी फौंडेशनमध्ये तृतीय क्रमांक आला होता.पावसाळा चालू होऊन तीन महिने होऊनही पाऊस पडला नव्हता, त्यामुळे पाणी फौंडेशनचे फलित या वर्षी मिळणार नाही अशी भीती कुलाळवाडीच्या नागरिकांना होती, मात्र 4 दिवसांपूर्वी सलग 3 तास पाऊसाने झोडपले. नाला, बंधारे,तुडुंब भरून आहेत व पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला. एवढ्या पाण्याने 5 वर्षे कुलाळवाडी गावाला कमी पडणार नाही अशी स्थिती आहे, त्यामुळे नागरिक समाधानी आहेत.
कुलाळवाडी ता.जत येथे जलयुक्त शिवार योजनेतून काम झालेल्या बंधाऱ्यांती पाण्याचे पुजन करताना आ.विलासराव जगताप व मान्यवर