आंवढी परिसरात दुष्काळी स्थिती पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व चारा डेपो सुरू करण्याची मागणी

0
13

आंवढी वार्ताहर: जत तालुक्यातील आंवढी सह उत्तर भागातील अंतराळ,लोहगाव,सिंगनहळ्ळी, शेगाव परिसरात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची तीव्रता गडद झाली आहे. पाणी टंचाई, जनावारांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
जत तालुक्यातील उत्तर भागातील डोंगराळ परिसर असणाऱ्या आंवढी,अंतराळ,बनाळी,सिंगनहळ्ळी परिसरात यंदा अत्यअल्प पावस पडला.त्यामुळे गेल्या महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे तातडीने टँकर चालू करण्याची गरज आहे.दुसरीकडे शेतकऱ्यांचे रब्बी,खरीप हंगाम वाया गेल्याने जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची भिषण स्थिती झाली आहे. चारा पुर्णत:संपल्याने बाहेरून आणलेला ऊसाचा चारा शेतकऱ्यांना विकत घ्यावा लागत आहे. अगोदरच मेटाकुटीला आलेला शेतकरी पाऊस दिवसेनदिंवस लांबत असल्याने मेटाकुटीला आला आहे.सध्या परिसरीतील जनावरे वाचविण्यासाठी बाहेरून आलेल्या ऊसाचा चारा 3500 ते 4000 रूपये दराने विकत घेत आहेत. पडलेले दुधाचे दर व भडकलेले चाऱ्यांचे दर यामुळे पशूधन संपण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने चारा डेपो व पाण्याचे टँकर सुरू करावेत अशी मागणी होत आहे.

आंवढी परिसरातील जनावरांचा चारा संपल्याने सुमारे 4000 हाजार रूपये टन दराने ऊसाचा चारा विकत घ्यावा लागत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here