मनरेगावरून पुन्हा रणखंदन पं.स.मधील प्रकार : आढावा बैठकीत भाजप-कॉग्रेस नेते एकमेकांच्या अंगावर

0
Rate Card

पोलीस बंदोबस्त बैठक

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील बहुचर्चित मनरेगाची थकीत बिले व नविन कामे यासाठी आयोजित आढावा बैठकीत भाजप व कॉग्रेस नेत्यात घमासान झाले. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर धावून गेल्याने गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले.पंचायत समिती सभागृहात टोकाच्या वादाची स्थिती निर्माण झाल्याने अखेर पोलीसांना बोलविण्यात आले.गोंधळानंतर बैठक अर्धा तास तहकूब करण्यात आली.आमदार विलासराव जगताप व कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी एकमेकांवर जोरदार टिका केली.
पंचायत समिती सभागृहात सोमवारी मनरेगा बिले व अपुर्ण कामे,नविन कामे यासाठी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,पदाधिकारी,अधिकारी, ग्रामसेवक यांची आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.बैठकीस कॉग्रेस नेते विक्रम सांवत,सभापती तम्मणगौडा रवीपाटील, मंगल जमदाडे, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे,भाजप नेते अॅड.प्रभाकर जाधव, जि.प.सदस्य सरदार पाटील, महादेव पाटील,स्नेहलता जाधव,आप्पासाहेब नामद,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, मनोज जगताप,रवींद्र सांवत, नाथा पाटील, श्रीदेवी जावीर,आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीत प्रांऱभी कॉग्रेस नेते विक्रम सांवत व त्यांच्या सहकार्याने आक्रमक भुमिका घेतली.मनरेगा योजनेची माहिती सभागृहात घ्यावी,असा आग्रह धरला.आमदार जगताप यांनी ही माहिती घेण्याची सभा नाही.आढावा बैठक आहे.ज्यांना माहिती हवी आहे.त्यांनी वैयक्तीक माहिती घ्यावी,असे सांगितले.त्यावेळी कॉग्रेस नेते आक्रमक झाले.सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांनी आमदार जगताप यांच्या भुमिकेस पाठिबां देत आक्रमक भुमिका घेतली. त्यावेळी कॉग्रेस नेते दिग्विजय चव्हाण यांच्यात बचाबाची झाली.नेते व सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेले.त्यामुळे सभागृहात एकच कल्लोळ झाला.काही बाहेरील लोंकानी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे आमदार जगताप यांनी सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली.
दरम्यान भाजप-कॉग्रेस नेत्यांची संघर्षाची माहिती बाहेर समजताच दोन्ही गटाचे अनेक कार्यकर्ते पंचायत समितीत दाखल झाले.जत पोलिसांना पंचायत समितीत बोलवावे लागले.पोलीस निरिक्षक राजू तहसिलदार फौजफाट्यासह पंचायत समितीत आले.त्यांनी बैठकीशी संबध नसणाऱ्यांना बाहेर काढले.पंचायत समितीचे मुख्य गेट बंद करून पोलीस संरक्षणात सभेला सुरूवात पुन्हा सुरूवात झाली.
आमदार जगताप म्हणाले, तांञिक माहिती असलेल्या अधिकाऱ्यांकडूनच एम.बी.करून घेण्यात यावी.जी कामे पुर्ण झाली आहेत. अशा कामांची एम.बी.लिहून त्यांची बीले देण्यात यावीत.कामाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.कामचुकारांना नोटीसा काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.नविन कामे तातडीने सुरू करण्यात यावीत.
गटविकास अधिकारी वाघमळे यांनी संपुर्ण कामांची यादी वाचून दाखविली.तालुक्यातील 300 विहिरी,236 मातीबांध,178 रस्ते,89 सिमेंट बंधारे,101 गोठ्याची कामे अपुर्ण असल्याचे सभागृहात सांगितले.या कामाची पाहणी करून बिले देण्यात यावीत अशी मागणी आ.जगताप यांनी केली.त्याला कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी विरोध नोंदविला.तर बीले द्यावीत असे मत आमदारांनी व्यक्त केले.
सभेत थकीत बीलावर चर्चा झाली.कॉग्रेस नेते विक्रम सांवत म्हणाले, विहिरीची सात वर्षापासून बीले थकीत आहेत.गोठे व शौच्छालयाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागत आहेत.अधिकारी,कर्मचारी टोलवा-टोलवी करित आहेत.त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सांवत यांनी केली.

सावंतांचा सभा उधळण्याचा प्रयत्न
कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे ते उतावीळ झाले आहेत. सभागृहात गुंडांना बोलवून गोधळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला.आढावा बैठक म्हणजे कुस्त्याचा आखाडा नव्हे.बैठकीच्या विषयाचा अभ्यास न करता सांवत बैठकीला आले.व त्यांनी बैठकीत गोधळ घालत बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही अशा प्रकाराचा निषेध करतो.
-आ.विलासराव जगताप

मनरेगाच्या बिलासाठी अधिकाऱ्यांवर दबाव
मनरेगामध्ये कोणाची किती बिले थकली आहेत.हे सर्वश्रुत आहे. जनतेच्या बिलासाठी जीआर आडवा केला जातो.ठेकेदारांची बिले देण्यासाठी आमदार जगताप यांनी आढावा बैठकीचा फार्स केला आहे. ज्या कामांची कोणतीच कागदपत्रे नाहीत.कामे प्रत्यक्षात आहेत का नाहीत.यांची संपुर्ण माहिती नाही.अशा कामाची बिले काढण्यात आमदारांचा पुढाकार आहे.त्यामुळे ते अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत.
-विक्रम सांवत, कॉग्रेस नेते

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.