जत,प्रतिनिधी: जत तालुक्यात तीव्र पाणी टंचाईने होरपळत असलेल्या गावांना तातडीने पाणी देणे अथवा दुष्काळी उपाययोजना करणे गरजेचे होते.मात्र सत्ताधारी मंडळीकडून झालेल्या कामाचे पुन्हा उद्धाटन करून दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा उद्योग सुरू आहे.पाणी,दुष्काळी उपाययोजना असे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी धमक नसेलतर आमदार व त्याच्यां पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी टिका पत्रकार बैठकीत कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी केली.
सांवत पुढे म्हणाले,सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी,कर्मचारी कमी आहेत.मराठी शाळात 250 शिक्षक कमी असल्याने शिक्षणाची दयनीय आवस्था झाली आहे.माडग्याळ मध्ये प्रंचड पाणी टंचाई आहे.तेथे खरतर दुष्काळी उपाययोजनासाठी आढावा बैठक घेणे गरजेचे होते. मात्र यापुर्वी दोन वेळा उद्घाटन केलेल्या रुग्णालयाचे तिसऱ्या वेळी उद्धाटन घेण्यात पालकमंत्री व आमदारांना धन्यता मानतात.तालुक्यातील सुमारे 20 वर गावांना टँकरची मागणी होत आहे.रब्बी,खरीप दोन्ही हंगाम वाया गेले आहेत.जनावरांच्या पिण्याचे पाणी,चारा,नागरिकांना पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.शासन केवळ टँकर मुक्त तालुका या नावाखाली भिषण दुष्काळ असताना टॅकर दिले जात नाहीत.संभाव्य टंचाई आराखडा प्रशासनाकडून तयार करून शासनास सादर गरजेचे होते.मात्र अद्याप प्रशासनाकडून दुष्काळ उपाययोजना करण्याचे पाऊल उचललेले दिसत नाही.अथवा तालुक्याचे आमदार म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधी मंञ्याचा दोऱ्यात सुद्धा दुष्काळी परिस्थिती त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला नाही.केवळ झालेल्या कामाचे दुबार उद्धाटने करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत.ग्रामीण रुग्णालय तीन वर्षे सुरू झाले आहे.मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी स्टॉप नाही.ही गंभीर बाब दुर्लक्षीत करून उद्धाटनाचा फार्स केला जात आहे. तालुक्यातील रस्त्या संदर्भात निधी आणला खरा,मात्र या कामात निव्वळ टक्केवारीवर त्यांचा भर असून मातीमिश्रीत रस्त्याची कामे केली जात आहेत.त्या रस्त्यावर दोन-चार महिन्यात खड्डे पडत आहेत.पुन्हा-पुन्हा त्याच रस्त्याचे दुरूस्तीचे इस्टीमेंट करून शासनाच निधी डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य उपकेंद्रे कर्मचारी नसल्याने कुलूपबंद आहेत.तेथून आरोग्य सुविद्या मिळत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्राचीही आवस्था अशीच आहे.आरोग्य सुविद्या उपलब्धं करून देणे गरजेचे आहे. तेथे प्रयत्न होत नाहीत.पशुवैद्यकीय दवाखाना व ग्रामीण रूग्णालय शासकीय सामुदायिक उद्घाटन असताना आमदारांनी अधिकाऱ्यावर दबाव टाकून कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी यांची कल्पना न देता भाजपमय कार्यक्रमाचा उद्धाटन सोहळा घेऊन आपलीच पाठ थोपटून घेतली आहे.अशी टिका सांवत यांनी केली.
विक्रम सांवत, बसवराज बिराजदार,रवींद्र सांवत,शुंभागी बन्नेनवर, अभिजित चव्हाण, दिग्विजय चव्हाण,निलेश बामणे,पिराप्पा माळी आप्पा मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
विक्रम ढोणेचे कौतुक
जत तालुक्याच्या दौऱ्यांवर आलेले पालकमंत्री सुभाष देशमुख यांना संपुर्ण दौऱ्यात एकाही लोकप्रतिनिधीनी जनतेच्या समस्या बाबत निवेदन दिले नाही.मात्र विक्रम ढोणे यांनी जत तालुक्यातील सर्व तलाव म्हैशाळ योजनेच्या पाण्याने भरावेत,व पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करावेत अशी मागणीचे निवेदन दिले. त्याचे काम कौतुकास्पद असल्याचे यावेळी सांवत म्हणाले.






