अचकनहळ्ळी दोरडा: अद्याप धागेदोरे नाहीत

0

जत,प्रतिनिधी: अचकनहळ्ळी ता.जत येथील शिंदे कुंटूबियातील पाचजणावर हल्ला करून दरोडा प्रकरणाचा अद्याप धागेदोरे नाहीत.पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके विविध भागात दरोडेखोरांचा तपास करत आहेत.
अचकनहळ्ळी येथील सोन्नुरे वस्ती येथील दिलिप शिंदे यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री सुमारे दहा जणांच्या टोळीने दरोडा टाकून घरातील सर्वाचे हातपाय बांधून गंभीर मारहाण केली.घरातील पावणेदोन लाखाचा मुद्देमाल पळविला होता.विरोध करणाऱ्या शिंदे कुंटूबियातील पाच जणावर काठ्या,गजाने हल्ला चढवून दहशत करत चोरट्यानीं धाडसी दरोडा टाकला आहे.घटनास्थंळी जतच्या डिवायएसपी शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस निरिक्षक राजू तहसीलदार यांनी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या आहेत. पोलिसांची पथके दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. लवकरचं दरोडेखोरां पर्यत पोहचू असे पो.नि.तासीलदार यांनी सांगितले. दरम्यान धाडसी दरोड्यामुळे परिसरीतील नागरिंक चोरट्याच्या दहशती खाली आहेत.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.