जत | जत गेले खड्ड्यात,शहरासह तालुक्यातील अनेक रस्त्यावर पावसाने डबकी |
नव्या रस्त्याचीही पोलखोल
जत,प्रतिनिधी: ‘नेहमीच येतो पावसाळा अन् सोबतीला खड्डे’ अशी स्थिती जिल्हाभर उद्भवली आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यांतही खड्ड्यांची संख्या वाढली आहे. अगदी महामार्गांपासून ते ग्रामीण मार्गांवर खड्डेच खड्डे पडलेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही वाढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ खड्डे भरणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात संतधार पाऊस सुरू आहे. दुसरीकडे मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रासदायक अनुभवही वाहनधारक, प्रवाशांना घ्यावा लागत आहे. शहरातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली आहे. प्रत्येक जिल्हा मार्गावर, ग्रामीण मार्गावरही खड्ड्यांची संख्या वाढत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे घडूळ पाणी साचून राहत असल्याने वाहनधारकांना खड्डा असल्याचे लवकर समजत नाही.

त्यामुळे वेगवान वाहने त्यात जाऊन आदळत आहेत. बहुतांश खड्ड्यांची रुंदी व खोली जास्त असल्याने वाहनांचे नुकसान होते. गेल्या वर्षी खड्डे बजुविण्यासाठी पॅचिंग केले होते. त्याभोवतीही लहान- लहान खड्डे पाडू लागले आहेत. जत शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. पालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर इतके खड्डे पडले आहेत, की वाहनधारकांना रस्त्यातून वाहने चालवणे, पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील बनले आहे. संबंधित यंत्रणेने पावसाने उसंत देताच मुरमाने खड्डे भरणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही खड्ड्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यावर्षीही त्याचा राजकीय लाभ उठविण्यासाठी ‘सेल्फी वुइथ खड्डे’ विरुद्ध ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’चे राजकारण सुरू होईल. शिवाय, खड्ड्यांत रोपे लावणारेही कार्यकर्ते जागोजागी उगवू लागतील.
रस्त्यांवर का पडतात खड्डे?
क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक,रस्त्यांचा पाया कच्च असणे
रस्त्यांचे सदोष डिझाईन,रस्ते बांधताना सदोष सामग्रीचा वापर,रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होत नसल्याने,डांबर आणि सिमेंटच्या योग्य प्रमाणाचा अभाव
…असे करावेत उपाय
रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी गटार,पाणी, डांबरांचा संबंध कमी यावा, यासाठी रस्त्यांचे सिलकोट,पावसाळ्यात खड्डे बुजविताना पावसाळी डांबराचाच वापर,पाऊस उघडल्यानंतर कोल्डमिक्स पद्धतीने भरल्यास दीर्घकाळ टिकेल
अवजड वाहनांरस्त्याची, भविष्यातील वाहतुकीचा अंदाजाने रस्ते
नव्या रस्त्याची वाताहात
तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी मोठा निधी मिळाला आहे. तालुक्यातील बांधकाम विभागाच्या दोन विभागाकडून रस्ते तयार करवून घेतले जातात.नव्याने मोठ्या संख्येने रस्ते झालेत मात्र गत दोन दिवसापासून रिमझिम पावसाने त्यांच्या कामाची पोलखोल होत आहे. अगदी सहा महिन्यात नवे रस्ते दबले आहेत. काही रस्त्यावर खड्डे पडले आहेत.असाच आठ दिवस पाऊस राहिल्यास नवे रस्ते खड्डेमय होण्याची शक्यता आहे.
महामार्ग होण्याचे वर्षभरापासून गाजर
जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर या राज्य महामार्गाचे गाजर गेल्या वर्षापासून दाखविले जात आहे. कामही सुरू आहे मात्र जेथे खड्डे आहेत.ते सोडून इतत्र कामाने गती घेतली आहेत. खड्ड्यामुळे झालेल्या आवस्थेवर लोकप्रतिनिधी कडून आवाज उठवताच फक्त मुरूम भरून मलमपट्टी केली जाते.कालातंराने मुरमामुळे पावसाने घसरगुंडी होते.कडक उन्हाने उचटलेली दगडे, धुळीने हैराण होते.
जत शहरातील रस्त्याची आवस्था,नव्याने सुरू असलेल्या महामार्गावर घसरगुंडी बनली आहे.