संख कडकडीत बंद,संघटीत गुन्हा,तपास संशास्पद ; आरोपीला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी मोर्चा

0

संख,वार्ताहर: संख येथील एका 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार करून खून केल्या प्रकरणात एकाच आरोपीला अटक करण्यात आली आहे.हा गुन्हा संघटीत स्वरूपाचा आहे.अजून आरोपी अाहेत.मात्र तपास अधिकाऱ्यांनी एकाच आरोपीला अटक करून तपास गुंडाळण्याचा प्रयत्न चालविला आहे.त्यामुळे तपासअधिकाऱ्यांची भुमिका संशास्पद वाटते.त्यामुळे नविन कतृव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करून निपक्ष तपास करावा अशी मागणी करत मोर्चाने येत आरपीआयच्या वतीने तहसीलदार नागेश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,पिडित तरुणीचे कुंटूबिय दहशती खाली आहे.त्यांचे गावात घर देऊन पुनर्वसन करावे.तरुणी अनुसुचित जातीतील असल्याने आरोपीवर अॅट्रॉसिटी अक्ट अतर्गंत कारवाई करावी.यात अजूनही काही आरोपी आहे. त्यांना तातडीने पकडावे,पिडित कुटुंबीयाना शासनाने मदत करावी,तसचे संखचे पोलिस पाटील यांची प्रथमपासून भुमिका संशास्पद आहे. त्यामुळे त्यांना सहआरोपी करून त्याचे पद रद्द करावे,अरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवावा,चांगला वकिल नेमावा,पिडित मुलींच्या कुंटूबियांना न्याय मिळावा अशी कारवाई व्हावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.
सोमवार संखचा आठवडा बाजार असतानाही संखकरांनी कडकडीत बंद पाळून अंदोलनात सहभाग नोंदविला.संखच्या मुख्य चौकातून अप्पर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.तेथे निवेदन देण्यात आले.

Rate Card

बलात्कार,खून प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन तहसीलदार नागेश गायकवाड यांना आरपीआयच्या वतीने देण्यात आले.कडकडीत बंद पाळण्यात आला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.