जत | तालुक्यात दूध बंद आंदोलनास उस्फूर्त प्रतिसाद |

0
7

जत,प्रतिनिधी: गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं व दूध उत्पादकांनी पुकारलेल्या अंदोलनाला जत तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. रविवारी मध्यरात्रीपासूनच दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात झाली. तालुक्यात ठिकठिकाणी पडसाद  उमटले. येळवी,निगडी खुर्द,सनमडी,सोरडी,बनाळी,डफळापूर, सोरडी,दरिबडची सह अनेक गावात अघोषित दूध संकलन बंद करण्यात आले होते.दूध उत्पादकांनी दूध संकलन केंद्रात दूध घातलेच नाही तर काही ठिकाणी  रस्त्यावर दूध ओतून शासन धोरणाचा निषेध केला.सोरडी येथे दूधाचे वाटप प्रवासी व ग्रामस्थाना करण्यात आले.त
     तालुक्यातील राजारामबापू दूध संघ,वसंतदादा जिल्हा सहकारी दूध संघ,वारणा दूध संघ,स्वराज्य इंडिया लिमिटेड दूध संघ,सजंयकाका दूध उत्पादक संघ,बाबासाहेब दूध संघ ,प्रतिभा दूध संघ,हॅटसन अॅग्रो दूध संघ या दूध संकलन केंद्र व चिंलिग प्लॅटने  रविवारी पासून सुमारे दीड लाख लीटर दूधाचे संकलन केलेले नाही.त्यामुळे अनेक दुध उत्पादकांनी दुध वाटप करून निषेध नोंदविला.काही ठिकाणी दुध रस्त्यावर ओतण्यात आले.
शासनाने तीन रुपये दुध दर वाढवून उत्पादकांना चेष्ठा केल्याची भावना शेतकऱ्यांत आहे.दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणी त सापडला आहे. शासनाने यावर वेळ काढूपणाचे धोरण अवलंबलेने शेतकरी नाराजी व्यक्त  करत आहे.दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.त्याना शासनाने किमान 24 रुपये प्रतिलिटर दर द्यावा अशी मागणी यावेळी करण्यनोंदविला.

स्वाभिमानी शेतकरी संघचनेच्या वतीने पुकारलेल्या दुध बंद अंदोलनास जतेत मोठा प्रतिसाद मिळाला, अनेक गावात दुध ओतून देण्यात आले. काही ठिकाणी दुध वाटप करून निषेध नोंदविला.

सोन्याळ,वार्ताहर:  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या दुध बंद अंदोलनास सोन्याळ येथील दुध उत्पादकांनी पांठिबा दिला.रविवारी दुधसंकलन बंद ठेवण्यात आले होते. रस्त्यावर दुध ओतून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय बगली,सोमनिंग पुजारी,युवा नेते महांतेश बिरादार, बसवराज तेली,सैपनसाब नदाफ, तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल बिरादार ,रायप्पा काराजनगी, संघर्ष ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

गुगवाड येथे दुध बंद अंदोलन,दुधाचे वाटप केले

गुगवाड,वार्ताहर: येथे खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दुध बंद आंदोलन पाठिबां दर्शवत गावातील शेतकरी व पदाधिकारी स्वंय प्रेरित मोफत दुध वाटप केले.शासनाचे धोरण दुध उत्पादकांविरोधात आहे.वास्तविक पाहता दुधाचे दर 24 रुपये पर्यत पाहिजेत.मात्र शासनाने दुग्ध उत्पादकांची चेष्ठा करत अाहेत.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदोलनात सहभागी होऊन न्याय हक्कासाठी लढावे असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस नेते बसवराज उर्फ पिंटू कोंकणी, हालप्पा बंडगर, सुखदेव कोंकणी, गंगप्पा कोंकणी माजी संरपंच,शंकर कांबळेआण्णप्पा अदांनी ग्रा.प.सदस्य मल्लिकार्जुन उर्फ राजु अदांनी,आप्पय्या मटपती,गोपाल यंकची, शिवानंद अदांनी उपस्थित होते.

गुगवाड ता.जत येथे शासनाच्या निर्षेधार्थ दुध बंद अंदोलन करत दुधाचे वाटप करण्यात आले.

सोरडीत मसाला दुध वाटत आंदोलन

सोरडी:येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दुध बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.श्री.समर्थ समाधगिरजी महाराज दुध संस्था, जायंटस ग्रूप आॅफ सोरडी संगम व दुग्ध व्यवसायिक यांचे वतीने दुध रस्त्यावर न ओतून देता ते गावातील ग्रामस्थांना व लहान मुलांना वाटप करून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष मोहनराव गायकवाड, प्रकाश पाटील, जायंटस ग्रूप आॅफ सोरडी संगम सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.सोरडीत संकलन होणारे दोन हाजार लिटर दुध ओतून अंदोलन करण्यात आले.काही शेतकऱ्यांनी दुधांने अंघोळ करत शासनाला विरोध केला.

दरवाढीशिवाय माघार नाही – राजू शेट्टी”
पंढरपूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाच्या धर्तीवर दूध बंद आंदोलनाची धास्ती घेऊन जवळपास सर्वच खासगी संघांनी दूध घेण्यास सुट्टी दिली आहे. दरम्यान, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे. खा. राजू शेट्टी यांनी रविवारी मध्यरात्री विठ्ठल -रुक्मिणीचे दर्शन घेऊन नामदेव पायरीपासून दूध बंद आंदोलनाला प्रारंभ केला यावेळी ते बोलत होते.दरम्यान, संघटनेच्या मागणीवर सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने राज्यभरात ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या अडवण्यात आल्या असू काही ठिकाणी याला हिंसक वळण लागले आहे.
पुण्यामध्ये देखील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. यावेळी खा राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here