जत | रिक्त पदाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 17 जुलैला घंटानाद अंदोलन;विक्रम ढोणे यांची माहिती

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शासकीय कार्यालय प्रमुख अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहेत. हि पदे भरण्यासाठी शासकीय पातळीवर अद्यापही प्रयत्न होताना दिसत नाही. रिक्त पदामूळे तालुक्यातील विकासाची कामावर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय शासकीय योजनांची प्रभावीपणे  अंमलबजावणी करण्यासाठी अडचणी तर येत आहेतच,याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या शासकीय  कामाला अनंत अडचणी येत आहेत. या सर्वाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत तहसिल कार्यालयासमोर मंगळवार दि.17 रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे युवा नेते विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
               ढोणे पुढे म्हणाले की,तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.महसूल विभागात प्रांत अधिकारी पद प्रभारी,नायब तहसिलदारपद रिक्त, तलाठी यांची आठ पदे रिक्त आहेत. तर जत पंचायत समितीच्या कार्यालयात प्रभारी गटविकास अधिकारी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिवाय केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक,सहशिक्षक,लीपीक,यांच्या रिक्त पदांची संख्या मोठी आहे. आय.टी आय.सारख्या  महत्वाच्या कॉलेजचे प्राचार्य पद रिक्त आहे. आरोग्य व पशुसंवर्धन विभागात सुद्धा पदे रिक्त आहेत. बांधकाम व जलसंपदा विभागामध्ये मुख्य अभियंता,शाखा अभियंता,लिपिक नाहीत. तसेच तालुक्याचा कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभारी आहेत.मोठ्या संख्येने पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या रिक्त आहेत.जत शहराची लोकसंख्या सुमारे पन्नास हजाराच्या पुढे आहे.जत नगरपरीषदचे मुख्य पद असणारे मुख्याधिकारी  वर्षभरापासून रिक्त आहे.त्याशिवाय अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी पदे स्थापनेपासून प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाचा बोजवारा उडाला आहे.नैसर्गिक दुष्काळासोबतही जत तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रिक्त पदांचा मानवनिर्मित दुष्काळ पडला आहे. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडून त्यांच्या मानसिक दबाव पडत आहे. त्याशिवाय चालू असलेल्या विकास कामावर परिणाम झाला आहे.जत तालुक्याकडे शासनाचे लक्ष वेधून शासकीय कार्यालयातील रिक्त पदे तातडीने पूर्ण क्षमतेने भरावीत,यासाठी शासनाला जाग आणणे गरजेचे आहे. म्हणून या घंटानाद अंदोलनात जत तालुक्यातील सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते विक्रम ढोणे यांनी केले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.