जत | बलात्कार,खून प्रकरणी तरूणास अटक; संशयित संखचाच, प्रेमास विरोध केल्यानेच खून केल्याची कबुली |

0

जत,प्रतिनिधी;प्रेम संबंधास विरोध केल्यानेच बलात्कार करून खून केला असल्याची कबुली संख (ता.जत) येथील श्रीशैल बसगोडा दाशाळ (वय 20) याने दिली दाशाळ यास उमदी पोलीसांनी पुणे येथे जेरबंद केले. सोमवार 9 जून रोजी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका एकोणीस वर्षीय युवतीवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडली होती.अगदी निर्दयपणे खून करण्यात आला होता. गेल्या चार दिवसापासून पोलिसाकडून तपास सुरू होता.
जतचे प्रभारी पोलिस उपाधिक्षक अमरसिंह निबाळकर यांनी पत्रकारांना माहिती दिली.यावेळी उमदीचे सपोनि भगवान शिंदे उपस्थित होते.
       निंबाळकर म्हणाले, श्रीशैल दाशाळ वय-20 यानेच बलात्कार व खून केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक त्याच्या मागावर होते. तो पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील एका कारखान्यात काम करित असल्याचे समजले.त्यानुसार सपोनि शिंदे यांनी स्वत: पथकासह पुणे येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले. त्यास उमदी येथे आणून रितसर अटक केली.
दाशाळचे मयत युवतीशी प्रेमसंबंध होते. अलिकडे काही दिवसात ती दाशाळला टाळत होती.त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता. घटनेच्या दिवशी युवती ही घरी एकटीच असल्याचे पाहुन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तीने विरोध केला.मात्र त्याने तिला शेजारील ऊसात उचलून नेले. सुरूवातीस तिला जबर मारहाण केली.त्यांनंतर तिच्यावर तिथेच बलात्कार केला. त्यावेळी तरूणीने पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली. आपली आब्रु जाईल व पोलीस कारवाई होईल या भितीपोटी दाशाळने जागेवरच तरूणीचा हातानेच गळा आवळला व खुन केला. असा कबुली जबाब त्याने पोलीसांत दिला आहे.घटना घडल्यापासून सशयिंत पोलिसांना चकवा देत होता.तो पुणे येथील एका कंपनीत काम करत असल्याचा सुगावा उमदी पोलीसांना लागताच त्याला शनिवार(ता.14)पुणे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली आहे काय?यांचा तपास पोलिस करत आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा, उपअधिक्षक शशिंकात बोराटे,डिवायएसपी अमरसिंह निंबाळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पोलीस निरिक्षक भगवान शिंदे
यांनी तपास केला.त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक श्रींकात पिंगळ यांचे सहकार्य लाभले.दरम्यान आरपीवर कडक कारवाई करावी, गुन्हा फास्टट्रक न्यायालयात चालवावा अशा मागणीचे निवेदन आरपीआयच्या वतीने पोलीसांना देण्यात आले आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.