सोरडीतील महिलेचा व्हसपेठ नजिक दुचाकी अपघातात मुत्यू

0

जत, प्रतिनिधी  :
जत-चडचडण मार्गावरील व्हसपेठनजिक दुचाकीवरून पडल्याने
जयश्री सुरेश पडोळकर, रा.  सोरडी या महिलेचा मृत्यु झाला.  मागील चाकात साडी अडकल्याने हा अपघातात झाला. शुक्रवारी दुपारी अपघात झाला. याबाबतचा गुन्हा उमदी पोलिसात दाखल आहे.
अधिक माहिती अशी की,सोरडी येथील जयश्री या पती सुरेश पडोळकर व दोन मुलासोबत माडग्याळ येथील आठवडा बाजारासाठी दुचाकीवरून जात होते. व्हसपेठ नजिक दुचाकीच्या मागील चाकात जयश्री यांच्या साडीचा पदक आडकला. त्यामुळे त्या चालत्या दुचाकीवरून ऱस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मुत्यू झाला.दुचाकीवरील पती व मुले किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातानंतर माडग्याळ ग्रामीण रुग्णालय व जत ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार मिळाले नसल्याची नातेवाईकांनी तक्रार केली आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.