संख | बलात्कार,खून प्रकरणाचा चौथ्या दिवशीही सुगावा नाही,कुटुंबियांना धमक्या, जत तहसीलदारांकडून विचारपूस |

0

संख, वार्ताहर: संख ता.जत येथील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे. मुख्य सशयिंत अद्याप फरारी असल्याने पोलिसांची पथके त्यांचा पुणे,सोलापुर येथे शोध घेत आहेत.दरम्यान तहसीलदार अभिजित पाटील यांनी घटनास्थंळी भेट दिली. व पिडित मुलींच्या कुंटूबियांना पोलिस संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. सदर कुटंबियांना काही गावगुंडाकडून धमक्या दिल्याची चर्चा आहे 
चार दिवसापासून पोलिसांचा तपास सुरू आहे. दररोज घटनास्थंळ, संख पोलिस चौकी, उमदी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तपास अधिकारी,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून तपास सुरू आहे.संख येथील एका 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार करून तिचा निर्दयपणे खून करण्यात आला आहे. तरुणीचे कुंटूबिय घरात नसल्याचा गैरफायदा घेत नराधमांनी डाव साधला आहे.
गेले चार दिवसापासून या प्रकरणातील आरोपी शोधण्याचे काम उमदी पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी काही तरूणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र निश्चित सुगावा लागत नसल्याने पोलिस चक्रावले आहेत.
याप्रकरणी पिडित तरूणीच्या वडील व भावाने संशय व्यक्त केलेला काही सशयिंत अद्याप फरारी अाहे.त्यामुळे तपासास विलबं होत आहे.
संतापजनक घटना घडूनही आरोपींना अटक करण्यात आले नसल्याने नागरिकांतून उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गत चार दिवसापासून जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिंकात बोराटे, डिवायएसपी निंबाळकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थंळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या आहेत. बोराटे व निंबाळकर चार दिवसापासून संखमध्ये तळ ठोकून आहेत. दरम्यान पिडित तरूणीच्या कुंटुबीयांची जतचे तहसिलदार अभिजित पाटील यांनी भेट घेऊन विचारपूस केली.पिडित तरूणीच्या वडील व भावास काही गावगुंडाकडून धमकी देणे,दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी होत आहे.
गेल्या चार दिवसापासून आमच्यांकडून गतीने तपास सुरू आहेत.संशियतांकडून चौकशी सुरू आहे.
काही सशयिंत फरारी अाहेत. त्यांना पकडण्यासाठी पथके पाठविण्यात आली आहेत. लवकरचं आरोपींना पकडू असे तपास अधिकारी पोलीस निरिक्षक भगवान शिंदे यांनी सांगितले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.