सोन्याळ,वार्ताहर : डॉ.पंतगराव कदम यांच्या स्मरणार्थ विक्रम फाउंडेशन जत कडून जिल्हा परिषद शाळा सोन्याळ, उच्च प्राथमिक मराठी शाळा लकडेवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले.यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराय बिराजदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, लकडेवाडीचे सरपंच एकनाथ बंडगर,तानाजी लकडे,महादेव बंडगर,दयानंद मुचंडी,नितीन शिंदे, अजय कांबळे,मल्लिकार्जुन केंगार तुकाराम वालीकार वरिष्ठ मुख्याध्यापक रमेश राऊत,सिद्धेश्वर कोरे,लखन होनमोरे,दादासाहेब कोडलकर व लकडेवाडीतील ग्रामपंचायत पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.





