शेगाव | वृक्षसंवर्धन काळाची गरज : प्रकाश जमदाडे |

0

शेगाव,वार्ताहर ; वृक्षारोपण बरोबरच संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. वृक्षपासून आपल्याला सावली,आधार,अॅक्सिजन मिळतो.त्याकरिता पर्यावरणाचा समतोल राखणे महत्वाचे आहे.असे  प्रतिपादन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी शेगाव येथील वृक्षारोपण प्रसंगी केले.यावेळी शेगाव प्राथमिक शाळा,ग्रामपंचायत,पशुवैद्यकीय दवाखाना येथे सभापती मंगलताई जमदाडे व प्रकाश जमदाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
            जमदाडे पुढे म्हणाले कि,वृक्षतोडीमूळे पर्जन्यवृष्टी कमी झाले आहे. प्रदुषण वाढतच आहे.त्यामुळे व्यक्तीने बांधिलकी समजून प्रत्येकी 1 झाड लावून जगवावे.सरकारने 13 कोटी वृक्षलागवड अंतर्गत जत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला 1091 वृक्ष लागवडीचे उदिष्ट्य  देण्यात आले आहे.ते ग्रामपंचायतीनी पुर्ण करावे.
            त्याचबरोबर शेगाव येथील जि.प. शिक्षका सौ.वारे व व सौ.वाटे यांची बदली झाल्याने त्यांना  निरोप देण्यात आला.याप्रसंगी जमदाडे म्हणाले कि,मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता सर्वांना समान शिक्षण द्यावे,एक मुलगा शिकला की एक घर साक्षर होते.परंतु मुलगी शिकली की दोन घरे साक्षर करते.पंचायत समितीच्या माध्यमातून  ग्रामपंचायत व शाळांच्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील असे ही जमदाडे यांनी सांगितले.
              यावेळी पोलिस निरीक्षक राजीव तहसीलदार,सभापती सौ.मंगल जमदाडे,उपसभापती शिवाजी शिंदे,जि.प.सदस्या स्नेहलता जाधव,महादेव साळुंखे,अॅड प्रभाकर जाधव,सरपंच रविंद्र पाटील,धनाजी नरळे,मुख्याध्यापक शिंदे उपस्थित  होते.
    

Rate Card

शेगाव ता.जत येथे वृक्षारोपण करताना प्रकाश जमदाडे,सौ.मंगलताई जमदाडे व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.