गुगवाड,वार्ताहर: गुगवाड ते जत अशा मार्गावरील शालेय विद्यार्थी जतला जाण्यासाठी सुरू असलेली एसटी बस बंद केल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत होते.त्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी डेपो व्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सकाळची एसटी बस सुरू करण्याची मागणी केली होती.मात्र निवेदन देऊन चार दिवसानंतरही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी या मार्गावरून जाणाऱ्या बसेसच्या आडवे रस्त्यावर बसून अंदोलन सुरू केले होते.त्यामुळे तासभर वाहतूक खोंळबली होती.आमचे नुकसान होते अाहे.वेळेत बस नसल्याने शाळेचे तास चुकतात.त्यामुळे बस सूरू करा तेव्हाच आम्ही उठू असा पवित्रा विद्यार्थीनी घेतल्याने मोठी गोची झाली होती. दरम्यान तासाभरानंतर गावातील काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधला.त्यावर आजपासून बंद बस सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने विद्यार्थ्यांनी अंदोलन मागे घेतले.आज बस सुरू होणे अपेक्षित आहे. अन्यथा पुन्हा अंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यानी दिला आहे.
बंद बस सुरू करा मागणीसाठी गुगवाड मध्ये विद्यार्थ्यांनी बसेस रोकल्या





