संखमध्ये तरूणीचा बलात्कार करून खून तालुका हादरला:राहत्या घरातून अपहरण करत तिघा

0
14

नराधमांचे कृत्य : पोलीसांनी तिघांना घेतले ताब्यात

संख,वार्ताहर

:  जत तालुक्‍यातील संख येथे एकतर्पी प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय युवतीवर बलात्कार करून गळा दाबून खून केल्याचा मनाला सुन्न करणारा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. संखपासून दीड किलोमीटर अंतरावरील वस्तीमध्ये हा प्रकार घडला.संखमधील तिघांनी राहत्या घरातून अपहरण केले. घराशेजारी ऊसात बलात्कार करून निर्घण पणे खून केला. याप्रकरणी तिन संशयिताचे नावे निष्पन्न झाले आहे. उमदी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
घटनास्थंळ व पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, संखपासून दीड किलोमीटर अंतरावर जुना करजगी-संख रस्त्यावर पिडित मुलीचे कुटुंब वास्तव्यास आहे. युवती, तिचे वडील आणि तीन भाऊ असे चौघेजण राहत होते. युवतीच्या आईचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. मंगळवारी (ता.9) वडील संख येथील बाजारात गेले होते.तिचा एक भाऊ कोल्हापूरला परिक्षेसाठी गेला होता.दुसरा मोठा भाऊ परगावी तर लहान भाऊ शेळ्या चरायला घेऊन गेला होता.पिडित युवती घरी एकटीच होती. दुपारनंतर युवती घरासमोर कपडे धुणे धुवत होती.दरम्यान काही अंतरावर असलेल्या हौदातून पाणी अाणत असताना  संशयित आरोपीने तिचे अपहरण करून लगतच्या ऊसाच्या शेतात तिच्यावर बलात्कार केला,तरूणीने प्रतिकार करत आरडाओरडा केल्याने तिचा गळा दाबून खून केला.तरुणीचा गळा ही निर्दयपणे दाबण्यात आला आहे. त्यामुळे मानेचे हाड मोडले आहे.तशाच विवस्ञस्थितीत तिचा मृतदेह ऊसातच टाकून नराधमांनी पलायन केले.
दुपारी शेळ्या राखण्यासाठी गेलेला शेळ्या घेऊन भाऊ परत आला.घरी कोणी नव्हते.सविता वडिलासोबत बाजारास गेली असेल असे समजून तो घरी बसला.
सायंकाळी उशिरा वडील बाजारातून घरी परतले.त्यांच्यासोबत पिडित मुलगी नव्हती.कोल्हापूरला गेलेल्या भाऊही परत आला. तिघांनी धक्का बसला,घरीच असणारी मुलगी अचानक गायब झाल्याने सायकांळ पर्यत शोधाशोध झाली. रात्री उशिर झाल्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी शोध घेताना त्यांच्याच ऊसाच्या शेताशेजारी तिचे चप्पल दिसले.त्यांच्या पावलाच्या ठशावरून शोध घेतला असता.ती अर्धनग्न अवस्थेत ऊसात मृतावस्थेत पडली होती. तिच्यावर बलात्कार करताना गालाला चावा घेतल्याचे व्रणही दिसून आले.अगदी टेहाळणी करून तरूणीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून पाणी आणण्यासाठी गेल्यावर नराधमांनी तिचे अपहरण केले. पाणी आणण्यासाठी घेतलेली घागर तिथेच पडली होती. तरूणीस जबरदस्तीने उचलून घरापासून तिनशे फुटावर ऊसात तिला नेहले.ऊसही उंच असल्याने कोणासही यांची कल्पना आली नाही.नराधमांनी तिला विवस्ञ करून आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला.तिने आरडाओरडा केल्याने तिचा तसाच गळा आवळून खून केला.त्यादरम्यान झालेल्या झटापटीच्या खूनाही ऊसात आहेत.त्याठिकाणचा ऊसाच्या गांब्या मोडल्या आहेत.तरूणीचे अंतरवस्ञे व कुडत्यावरील पँट बाजूला पडलेले होते.मृत्तदेहावर ओरखडे होते.गालाचाही चावा घेतल्याचे वण्राच्या खूना मृत्तदेहावर आढळून आल्या आहेत.
खुनाच्या प्रकाराची माहिती उमदी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सकाळपासून तपासाची चक्रे गतीने फिरवली. प्राथमिक तपासात तीन संशयिताचे नाव निष्पन्न झाले आहे.सकाळी सशयिंत दोघांना ताब्यात घेतले आहे.मुख्य संशियतांसही रात्री उशिराने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकतर्पी प्रेमातून पिडित तरूणीची तो छेडछाड करत होता.याबाबत तिला समजही देण्यात आली होती.त्या प्रकरणापासून पिडित तरूणीस काही दिवस पाहुण्यांकडे ठेवण्यात आले होते.याचा राग मनात धरून त्यानेच मित्रांच्या मदतीने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसानी व्यक्त केला आहे. तिघेही संशियत संखचे आहेत. मुख्य सशयिंत हा गावातील पेट्रोल पंपावर कर्मचारी आहे.तर अन्य दोघेजण सख्ये भाऊ आहेत.त्यांच्याकडेही पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान पिडित तरूणीचा मृत्तदेहावर मिरज वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. तेथे दंडाधिकाऱ्यांच्या समक्ष,इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार आहे.हा गंभीर प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस प्रमुख शंशिकात बोराडे,जतचे प्रभारी डिवायएसपी निंबाळकर यांनी भेट दिली.पिडित तरूणीच्या कुंटुबीयांची विचारपूस करून तपासाच्या सुचना दिल्या आहेत.
पुर्ववैमनस्य व प्रेमप्रकरणातून त्याने खून केल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here