बेवनूर | चुलत बहिणीचे यश:एक महिला पोलीस उपनिरीक्षक,दुसरी डॉक्टर |

0

कोसारी,(नानासाहेब भोसले):महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच अन्य क्षेत्रात यश मिळवलेल्या यशस्वितांचा गुण गौरव बेवनूर ग्रामस्थांच्या वतीने  गावचे सुपुत्र सोलापुरचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,तहसीलदार दगडू कुंभार तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला.
बेवनूरची ओळख अधिकाऱ्यांचे गाव म्हणून आहे.ती शिंदे बहिणीमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. या गावातील अनेक अधिकारी प्रशासनात कार्यरत आहेत.यात आणखी भर पडली असून या गावातील कन्या सुरेखा अशोक शिंदे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवून गावातील पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवला आहे.तिची चुलत बहीण राधिका रघुनाथ शिंदे हिने एमबीबीएस करून गावची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला.
     तसेच बेवनूर आजोळ असलेली अंजना रमेश गायकवाड कडलास हिने ही पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तिचा ही यावेळी सत्कार करण्यात आला .
    या गुणगौरवप्रसंगी यशस्वीताचे मार्गदर्शन ग्रामस्थांना तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना लाभले. गावातील विविध क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग,मान्यवर ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

Rate Card

बेवनूर ता.जत येथे गुणवंताचा सत्कार करण्यात आला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.