जत | नगरपालिकेने प्लास्टिकविरोधी मोहीम गुंडाळली; व्यापाऱ्यांकडून राजरोसपणे होतोय कॅरिबॅगचा वापर |

0

जत,प्रतिनिधी : नगरपालिकेनेही  प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची जोरदार कारवाईच गुंडळल्याचे चित्र आहे.बंदीपासून पालिकेकडून एकही कॅरिबॅग जप्ती आणि दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात राजरोसपणे कॅरिबॅगचा वापर सुरू झाला आहे.
पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगचा त्रास सर्वाधिक महापालिकेलाच आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या कॅरिबॅग आढळून येतात. दरवर्षी पावसाळ्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कॅरिबॅग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मागील चार महिन्यांपासून शहरात कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रमुख रस्त्यांवर कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या कचऱ्यात सर्वाधिक कॅरिबॅग दिसून येतात. या कॅरिबॅगवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्पही पालिकेकडे नाही. कॅरिबॅग पालिकेसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरत आहे. त्यातच राज्य शासनाने कॅरिबॅगवर बंदी घातली.आदेशानंतरही पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही.तशी शक्यता ही नसल्याने शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी कागदाच्या पिशव्यांचा वापर सुरू केला आहे.भाजीमंडईत फळेसुद्धा कागदी पिशवीत टाकून देण्यात येत आहेत. शहरातील दूध विक्रेतेही कॅरिबॅगचा वापर बंद करून ग्राहकांना दुधासाठी कॅन आणावी, असा आग्रह धरीत आहेत. ज्यांच्याकडे कॅनच नाही, त्याला तूर्त कॅरिबॅगमध्ये दूध दिले जात आहे. 

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.