गुगवाड | डॉ.पंतगराव कदम यांच्या स्मरणार्थ तालुक्यातील शाळांत वह्याचे वाटप |

0
42

गुगवाड,वार्ताहर : जत शहर व बिंळूर जि.प.मतदार संघातील जिल्हा परिषद,माध्यमिक शाळांत माजी मंत्री डॉ.पतंगरावजी कदम यांच्या स्मरणार्थ दहा हाजार वह्याचे वाटप करण्यात आले. गरिब,होतकरू व गरजू, विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून हा वह्या वाटप करण्यात येत आहे.तालुक्यातील सर्व जि.प.शाळात एक लाख वह्याचे वाटप करण्याचे नियोजन अाहे.
आमदार मोहन कदम,व आमदार विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांनी हे नियोजन केले आहे. मंगळवारी श्री.दत्त माद्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद येळदरी,बिळुर,सिंदूर,गुगवाड,वज्रवाड,ख़िलारवाड़ी,बसर्गी,उमराणी या गावामध्ये सर्व विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माज़ी पं. स.सभापती बाबासाहेब कोडग,किशोर कोहळळी व पदाधिकारी उपस्थित होते.

जत शहर व बिंळूर जि.प.मतदार संघातील शाळात डॉ.पंतगराव कदम यांच्या स्मरणार्थ वह्याचे वाटप करताना कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत व मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here