डफळापूर; गँस एंजन्सीकडून कार्डधारकांची लुट सुस्त पुरवठा विभाग लक्ष देईना : पावत्या नाहीत,बुकिंगही नाही

0

डफळापूर, वार्ताहर : घरगुती गॅस सिलिंडरच्या व्यवस्थेत शासनाने कितीही पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यातील दलालांची यंत्रणा मार्ग काढून लूटमार करीत आहे. त्यात आता सिलिंडर पुरवठा करणाऱ्या वाहनधारकांची दलाली वाढली आहे. सिलिंडरमागे वीस रुपयांच्या दलालीचा आग्रह केला जातोय. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही आणि तक्रार कुठे करायची, हा प्रश्‍न असल्याचे लोक सांगताहेत.डफळापूर येथे नव्याने बिंळूर येथील एंजन्सीला अचानक अनेक कार्डधारक ट्रान्सफर केले आहे. गेल्या तीन महिन्यापासून तेथील एजन्सी कडून गँस पुरविले जात आहेत. मात्र गँस बुकिंग न करताच गँस टाक्या वितरण होतात.बिलाच्या पावत्याविना लमसम पैसै घेतले जात आहेत. अनेकवेळा ठरलेल्या दिवशी गाडी येत नाही.सबसिडी जमा होत नाहीत.अशा अनेक तक्रारी डफळापूरातील कार्डधारकाच्या आहेत.अचानक एंजन्सी बदलल्याने झालेला गोंधळ संपाचे नाव घेत नाही.
ग्रामीण भागात सिलिंडर घेताना वितरण कंपनीचा कामगार वरकड 20 रुपये घेतोय. ज्याला दर माहिती आहे, त्याने विचारले, ‘कशाचे?’ तर पोच करण्याचे असे सांगितले जातेय. सामान्यतः लोकांना सिलिंडरचा चालू दर काय, हेच माहिती नसते. त्यामुळे मागेल तेवढे पैसे देणे, एवढाच विषय. त्याचा गैरफायदा घेतला जातोय. दुसरीकडे गावोगावच्या दलालांनी सिलिंडर कार्डवर कब्जा केला आहे. त्यांच्याकडे सिलिंडरचा साठाही सुरू झाला आहे.

दरपत्रक नाही…काटा विसरलाय
गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. ती ग्रामीण भागात दिली जात नाही. गाडीवर दरपत्रक लावणे गरजेचे आहे. ते लावले जात नाही. सिलिंडरचे वजन करायचा काटा विसरला, असे सांगितले जाते. या साऱ्या बाबी गंभीर असून, त्याकडे कंपनी आणि पुरवठा विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Rate Card

गँस एजन्सीची झाडाझडती घेण्याची गरज

जत तालुक्यातील गॅस एंजन्सीना पुरवठा विभागाने अंदन दिले आहे. जत तालुक्यातील ग्रामीण भागात सिलेंडर कितीला विकला जातो,किंमत किती आहे. यांची माहितीही दिली जात नसल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील चार गँस एंजन्सीकडून ग्राहकांची लुट सुरू केली आहे. अनेक कार्डधारकाचे अनुदान जमा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. कार्यालयात ग्राहकांना हिन वागणूक दिली जात आहे. कुठे तक्रार करायची तेथे करा म्हणून धमकाविण्याचे प्रकार घडत आहेत.गँस एंजऩ्सा लोकांच्या हितासाठी आहेत. का ? एंजन्टाचे पैसे कमविण्याचे साधन बनल्यात हे कळत नाही. पुरवठा विभागाने या गँस एंजन्सींना अर्थपुर्ण सहयोग असल्याने गँस एजन्सीचो मालक, कर्मचारी सुसाटपणे तालुक्यातील जनतेला लुटत आहेत. देशाच्या पंतप्रधान दुर मुक्त घरे करण्याच्या योजनेला या गँस एंजन्सीनी हारताल फासला आहे. मोफत गँस जोडणीतही गफला झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांनी जत तालुक्यातील गँस एंजन्सीची झाडाझडती घ्यावी अशी मागणी आहे.

डफळापूर ता.जत येथे गँस गाडी येताच अशी गर्दी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.