चित्रपट ” यंग्राड ” चार युवकांची मनोवेधक कथा “,,,

0
8

एकाच वस्तीत राहणाऱ्या चार जिवलग मित्रांचे स्वभाव वृत्ती वेगवेगळे असले तरी ते एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतातह्या मध्यवर्ती कल्पनेवर निर्माते विठ्ठल पाटील,गौतम गुप्तामधू मंटेंना यांनी त्यांच्या विठ्ठल पाटील प्रॉडक्शनफ्यूचरवर्क्स मीडिया लिमिटेडफँटम फिल्म्स या चित्रपट संस्थेतर्फे ” यंग्राड ” ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहेया सिनेमाची कथापटकथादिगदर्शन मकरंद माने यांचे असूनगीते क्षितीज पटवर्धनदत्ता पाटीलमाघलुब पुनावाला यांची असून हृदय आणि गंगाधर यांनी संगीत दिले आहेया मध्ये चैत्यन्य देवरेसौरभ पाडवीशिव वाघजीवन करळकरशशांक शेंडेशरद केळकरसविता प्रभुणेशिरीन पाटीलमोनिका चौधरीविठ्ठल पाटीलशंतनू गणगणेहे कलाकार आहेत,या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार आणि दिगदर्शक यांची भेट घेतली त्यावेळी दिगदर्शक मकरंद माने यांनी सांगितलं कि यंग्राड हा शब्द यंग आणि राडा या दोन शब्दांचे मिश्रण करून बनवला आहेमुलांच्या भावविश्वात टूकारपणा असतोदंगामस्ती करणारी मुले असा त्याचा अर्थ होऊ शकतोमुले टुकार आहेत म्हणजे मुलांची वृत्ती ह्या अनुषंगाने हा शब्दप्रयोग केला जातोटूकारपणा म्हणजे खोडसाळपणा प्रत्येक मुलं हि काहींना काही प्रमाणात खोडकरपणा करीत असतात पण त्याला बंधन हवेमला कुठे थांबायचं हे त्या मुलांना माहित असायला हवे.पालक आणि मुलगा यांचे नातेसंबंध कसे असावेत आणि आहेत ह्यावर हा सिनेमा भाष्य करतोपालकांचं लक्ष मुलाकडे किती प्रमाणात आहे ह्यावर सुद्धा सिनेमा भाष्य करतोह्या मुलामुलांचे मित्रमैत्रिणी असतातत्यांच्या किशोर वयात त्यांना वाटते कि आपले भावविश्व म्हणजे आपले मित्रमैत्रिणीचं आहेतमित्रांच्यामध्ये कोणी चुका केल्या तर दुसऱ्या मित्राने त्याला समजावून सांगितलं पाहिजे अर्थात त्याला नीट समज दिली पाहिजेचहि विक्याबाप्पाअंत्यामोन्या ह्या चार मित्रांची कथा आहेत्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेतविक्या ची भूमिका हि चैतन्य देवरे करतो तो म्हणाला कि हा विक्या निर्णय घेण्यात पटाईत आहेखूप समजूतदार असून तो निर्णय अचूक घेतो,, बाप्पा ची भूमिका जीवन करळकर करतोय तो म्हणाला ह्या मुलाला फक्त खाणं आणि मौज मस्ती करणे इतकेच माहित असतेतसा तो शांत असतो पण तो आपली प्रतिक्रिया लगेच देत नाही. ,, अंत्या ची भूमिका सौरभ पाडवी करतोय त्यांनी सांगितलं किहा अंत्या कोणालाच दुखवत नाहीअंत्याचे वडील हे घाटावर श्राद्ध पक्ष अशी धार्मिक कार्ये करीत असतातह्या कामात अंत्याला रस नसतो,त्याला हा वडिलांचा व्यवसाय आवडत नाहीपण त्यांना वाईट वाटू नये म्हणून तो त्यांच्या बरोबर काम करीत असतो.,,, मोन्या ची भूमिका शिवा वाघ करतोय ह्या शिवाला दुनियेची कसलीच फिकीर नसते किंवा तो ह्या गोष्टी चा विचार करीत नाहीतो आपल्याच मस्तीत गुंग असतोतो मित्रांसाठी काही सुद्धा करण्यासाठी तयार असतोअत्यंत धाडसी असा हा मुलगा आहे.हि सगळीच मुले शाळेत जाणारी आहेतह्या मुलांची मैत्री लहानपणा पासून असते सारेजण घाटावरच्या एका वस्तीमध्ये हे सारे राहत असतातनाशिक निवडण्याचे कारण म्हणजे तेथील नदीवर असलेला घाट आणि त्या घाटाच्या आजूबाजूला बसलेलं शहर आहेह्या सिनेमाची कथा हि विक्याच्या भोवती गुंफली आहेत्याची तेजू नावाची मैत्रीण आहे ती भूमिका शिरीन पाटील हि साकारते आहेहि मुलगी साधी सरळ स्वभावाची आहेशाळा घर आणि मैत्रीण ह्या भोवतीच तिचे आयुष्य असते तिला खोडसाळपणा अजिबात आवडत नाही.शशांक शेंडे यांनी विक्याच्या वडिलांची भूमिका केली आहेते म्हणाले किआपल्याकडे मुलगा आणि वडील यांच्या नात्यामध्ये अंतर राखलेलं दिसून येतं आजच्या काळात ते बदललेलं आहे, ” ओ बाबा च्या ठिकाणी ए बाबा ” पर्यंत आलं आहेअसे असलं तरी वडील मुलगा ह्याचं नातं हे घट्ट आहेविक्या आणि त्याचे वडील यांच्यात संवाद नाही पण विसंवाद सुद्धा नाहीतारुण्य सुलभ वयातील मुलगा जसा वागायला हवा त्याप्रमाणे विक्या वागत असतोपण त्याने बालपण हे जपलं पाहिजे त्यांच बरोबर जबाबदारीची जाणीव सुद्धा ठेवायला हवीखरं म्हणजे खोडकरपणावांडपणा आणि गुन्हेगारी ह्या मध्ये एक अंधुकशी रेषा आहे ह्याची जाणीव ठेवायला हवीत्यामुळे खोडकरपणादंगामस्ती करत असताना ती मुले गुन्हेगारी कडे कधी वळतात हे त्याना हि कळत नाहीगुन्हेगारी करून जो आलेला पैसा असतो तो खरं तर आपला नाहीतो दुसऱ्याचा आहेदुसऱ्या कोणाचे सुख आपण ओरबाडून आणतो आहोत हे पालकांनी मुलांना सांगायला पाहिजे.यंग्राड हा सिनेमा पालक आणि मुले ह्यांच्या नातेसंबंधावर भाष्य करतो.
दीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी ९९३०११२९९७

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here