जत | रामपूरमधील ग्रामसेवकांने निरक्षर संरपचाला 5 लाखाला फसविले |

0

24,500 रुपयाच्या धनादेशावर सही घेऊन पुन्हा 5 लाख वाढविले : चौकशीसाठी तिन विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक

Rate Card

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील रामपूर कोळेकर या  निरक्षर महिला संरपचाला ग्रामसेवकांने 5 लाख रुपयांना फसविल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे महिला संरपच कोळेकर यांनी दिली.यावेळी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, माजी संरपच मारूती पवार उपस्थित होते.
दरम्यान या तक्रारीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन तक्रारदार संरपच कोळेकर यांना राऊत यांनी दिले.
जत तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायतीच्या निरक्षर महिला संरपचांचा फायदा घेत ग्रामसेवक संघटनेचा अध्यक्ष असलेल्या ग्रामसेवक भास्कर जाधव यांनी देखभाल खर्चाच्या 24 हाजार 500 रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली होती.मात्र ग्रामसेवकांने हा धनादेश फाडून पुन्हा हीच रक्कम दुसऱ्या धनादेशावर लिहून संरपचांची स्वाक्षरी घेतली.मात्र ग्रामसेवक जाधव यांनी धनादेशावर 24 हाजार 500 रुपयाच्या पुढे 5 लाख ही रक्कम आकडी,अक्षरी लिहून बँकेतून पैसे काढल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान महिला संरपच कोळेकर यांनी स्वत: ही तक्रार बुधवारी राऊत यांच्याकडे दिली आहे.दरम्यान यावेळी उपस्थित असलेले आमदार विलासराव जगताप यांनी असे प्रकार चुकीचे आहेत.पुर्ण चौकशी करण्यात यावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीसाठी तिन विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.गुरूवारी यांची सविस्तर चौकशी,तपासणी केली आहे. विस्ताऱ अधिकारी याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्याकडे देणार आहेत.दरम्यान संबधित ग्रामसेवक जाधव ग्रामसेवक संघटनेचा पदाधिकारी असल्याने पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनाही दमदाटी करत असतो.आतापर्यत यांची नोकरी फक्त जत शहराच्या लगतच्या गावात झाली आहे. अनेक ग्रामपंचायतीत असे प्रकार झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ग्रामसेवकांनी नोकरी केलेल्या गावांची तपासणी करावी अशी मागणी जि.प.सदस्य सरदार पाटील यांनी यावेळी केली.

सर्व सदस्याच्या संमतीने हे पैसे झालेल्या व पुढे होणाऱ्या पाणी पुरवठा पाईपलाईन कामाचे बिल देण्यासाठी काढले होते.राजकीय वादातून तक्रारीचा प्रकार झाला आहे. यात कोणताही अपहार झालेला नाही.काढलेले पैसे बँकेत भरले आहेत.
भास्कर जाधव,ग्रामसेवक रामपूर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.