प्रतापपुर | आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिघा विरोधात जत पोलिसात गुन्हा |

0

जत,प्रतिनिधी:प्रतापपुर ता.जत येथील नितिन मारूती खांडेकर (वय-22) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बिरा कृष्णा खांडेकर, मनोहर कृष्णा खांडेकर, संगिता मनोहर खांडेकर सर्वजण रा. प्रतापपुर या तिघा विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी मयताचे भाऊ सर्जेराव मारूती खांडेकर यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, नितिन खांडेकर यांनी 17 जून रोजी शेतातील लिंबाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली होती.
नितिनला संशियतांच्या नातेवाईकांबरोबर अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून वरील तिघांनी शिवीगाळ व मारहाण केली होती. त्याचबरोबर  गावात बैठक बोलवून तुझी बदनामी  करतो अशी धमकी दिली होती. याचे मनास वाईट वाटून घेऊन नितिन यांने गळफासाने आत्महत्या केली होती. त्याने सशयिंताच्या दमबाजीमुळे आत्महत्या केली आहे अशी फिर्याद नितिनचा भाऊ सर्जेराव खांडेकर यांनी दिली. आत्महत्येस जबाबदार धरून तिंघाविरोधात 11 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.