शेगाव | ट्रॅक्टरखाली सापडून शेतकरी ठार |

0
7

जत,वार्ताहर: शेतामध्ये ट्रॅक्टरने कुळवणी करत असताना कुळवावर बसलेल्या शेतकऱ्यांचा तोड जाऊन ट्रक्टरच्या चाकाखाली सापडून मुत्यू झाला. माणिक कृष्णदेव पडोळकर(वय-67)असे ठार झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. घटना जत तालुक्यातील शेगाव येथे शनिवारी दुपारी घडली.
शेगाव येथील माणिक कृष्णदेव पडोळकर यांचे  वाळेखिंडी रोडपासून शेगाव विजवितरण सबस्टेशन पासून जवळच रस्त्याकडेला शेतजमिन आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतात पेरणी करण्यापूर्वी शनिवारी दुपारी पडोळकर यांनी शेत कुळवण्यासाठी ट्रॅक्टर (एमएच-10,सीएन-5680) द्वारे काम सुरू होते.ट्रॅक्टर चालक वसंत बाळासो हिरवे चालवत होते. ट्रॅक्टरने कुळवणी सुरू असताना अपेक्षित खोल कुळव लागत नसल्याने मयत शेतकरी पडोळक कुळवावर वजन  बसले होते. दुपारी साडेबारा वाजता शेतात ट्रॅक्टर सुरू असतानाच पडोळकर यांचा अचानक तोल गेला व ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले.चाक अंगावरून गेल्यान ते गंभीर जखमी झाले होते.घटनेदरम्यान जत येथील पत्रकार हरी शेटे हे सपत्नीक वाळेखिंडीकडे निघाले होते. त्यांनी तात्काळ प्रंसगावधान ओळखून गंभीर जखमी झालेल्या शेतकरी पडोळकर यांना स्वतःच्या गाडीतून जत ग्रामीण रुग्णालयात आणले. पण तोपर्यत गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्राणज्योत मावळली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.याबाबतची फिर्याद मुलगा समाधान पडोळकर यांनी जत पोलिसात दिली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here