जत | जत- ठाणे-कुर्लानगर आता शिवशाही बस |

0

जत,प्रतिनिधी : जत बसस्थानकातून सुटणारी जत- ठाणे-कुर्लानगर मार्गावर शनिवारी शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली शिवशाही बस जत बसस्थानकातून सुरू झाली आहे. जत आगाराला 2 शिवशाही बसेस मिळाल्या आहेत.त्या जतहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर शनिवारी पासून सोडण्यात आली.शनिवारी सायकांळी साडेसहाला पहिली बस मुंबईकडे रवाना झाली.जत स्थानकात किंबहुना तालुक्यात पहिल्यांदाच शिवशाही बस आल्याने औसुक्य व्यक्त होत होते.कर्मचारी, प्रवाशांना बसबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.सगळेच पहिल्या बसबरोबर फोटो काढून घेत होते. जत-मुंबई मार्गावरील जत-ठाणे-कुर्लानगर या मार्गावर ही बस धावणार आहे.सांगोला,अकलूज,वालचंदनगर,बारामती,जेजूरी,सासवड,पुणे,ठाणे,कुर्लानेहरूनगर अशी जाणार आहे.जत ते थेट चेंबूर पर्यत 840 रूपये तिकिट दर आहे.जतहून सायकांळी सहा वाजता ही बस कुर्लानेहरूनगर कडे सुटेल तर कुर्लानेहरूनगर हून सायकांळी 5.30 ला जतकडे सुटेल.शनिवारी औपचारिक उद्घाटन करून बस सुरू करण्यात आली. या शिवशाही बस मध्ये पुषबॅग,एसी,अत्याधुनिक सोय या बस मध्ये आहेत.ट्रव्हल्स् च्या स्पर्धेला तोंड देणारी ही बसला तुफान प्रवाशी मिळणार असल्याचे आगार व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.आगारप्रमुख व्होनराव,स्थानक प्रमुख महेश जाधव,वाहतूक निरिक्षक अविनाश कोकरे, शेखर कोळी,मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष मोहन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

जत आगारातून पहिली शिवशाही बस शनिवारी पासून मुंबईकडे रवाना झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.