जत,प्रतिनिधी: जत शहरातील रस्ते कायम चर्चेत असतात. लाखोचा निधी उचलूनही दर्जेदार काम दिसत नाही.शहरात गेल्या काही दिवस पाऊस सुरू आहे.दररोजच्या रिमझिम पाऊसाने शहराची दैना उडविली आहे. खराब रस्ते, खड्डे, चिखल यामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्या जतमध्ये पाऊस सुरू झाल्याने नव्याच समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. पावसामुळे शहरातील अनेक उपनगरे, मुख्य बाजारपेठ व रस्त्यांची दैना उडाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.शहरातील महाराणा प्रताप चौक ते मारूती मंदिर, गांधी चौक ते दगडी पूल, शिवाजी पेठ, शिवाजी पुतळा ते वाचनालय चौक, शिंदे पेट्रोल पंप ते सनमडीकर हॉस्पिटल व शिवाजी पेठ ते सोलनकर चौक या रस्त्यावर तर व्यवस्थित चालताही येत नसल्याची स्थिती आहे. रस्त्यावर साठलेल्या डबक्यात पाणी साठत असल्याने वाहन चालकासह ,पायी चालणारानाही कसरत करावी लागत आहे.
मंगळवार बाजार पेठेतील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. उपनगरातील रस्त्यांची याहून वाईट परिस्थिती आहे. पत्रकार नगर, महसूल कॉलनी, ईदगाह मैदान-जत हायस्कूल ते नदाफ गल्ली, विठ्ठलनगरचे अंतर्गत रस्ते, मोरे कॉलनी, विद्यानगरमधील साईप्रकाश मंगल कार्यालयासमोरील रस्ता, लक्ष्मी गार्डन, मेंढेगिरी रस्ता या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था विचारच न केलेल्याच बरा अशी स्थिती आहे.
गेल्या काही दिवसापासून साधा मुरूमही टाकण्याचे काम न नगरपालिकेने केले नसल़्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
जत शहरातील रस्त्याची शनिवारची स्थिती





