बालगावात लयबद्ध योगमुद्रांनी फेडले डोळ्यांचे पारणे

0

तीन विश्वविक्रम : नेटक्या नियोजनामुळे जतसह सिमावर्ती भागातील घराघरात योगांची महती पोहचली

Rate Card

विशाल पटांगणावर शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आबालवृद्ध, सूर्यनारायणाच्या साक्षीने एकाच वेळी लयबद्ध हालचालीत होणाऱ्या योगमुद्रा व ओंकारनादाचे सूर…अशा भारावलेल्या व सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वातावरणात बालगाव ता.जत येथील गुरूदेव आश्रमा समोर जतकरांनी योगसंस्कारांचा अनोखा अनुभव घेतला.जत तालुका व सिमावर्ती लाखावर आबालवृद्धांनी सांघिक योगासन करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी विद्यार्थ्यांनी लयबद्ध स्वरूपात योगमुद्रेचे प्रदर्शन केले.तीन वर्ड रेकार्ड यावेळी झाली.

जत,प्रतिनिधी : विशाल पटांगणावर शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आबालवृद्ध, सूर्यनारायणाच्या साक्षीने एकाच वेळी लयबद्ध हालचालीत होणाऱ्या योगमुद्रा व ओंकारनादाचे सूर…अशा भारावलेल्या व सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वातावरणात बालगावकरांनी योगसंस्कारांचा अनोखा अनुभव घेतला. लाखो आबालवृद्धांनी सांघिक योगासन करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी विद्यार्थ्यांनी लयबद्ध स्वरूपात योगमुद्रेचे प्रदर्शन केले.
बालगाव येथील गुरूदेव आश्रमातर्फे गुरुवारी चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ज्ञानयोगी प.पू.सिध्देश्वर स्वामी,कणेरी मठाचे काडसिध्देश्वर स्वामी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख,कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा.संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, भाजपनेते रविंद्र आरळी,जि.प.सभापती तम्माणगोंडा रवीपाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील,मंकरद देंशपाडे,प्रभाकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील पदाधिकारी, प्रमुख नेते,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील शिक्षक, शाळकरी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार योग प्रकार सादर केले.
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात योगचळवळ पोहोचण्याची आवश्यकता आहे. तरुणांना योगसाधनेचे महत्त्व कळायला पाहिजे. त्याला केवळ योग्य दिशा देण्याची गरज आहे.यासाठी योगदिनाच्या योग साधत बालगाव आश्रमाचे प्रमुख अमृत्तानंद स्वामी यांच्या संयोजना खाली या योग शिबाराचे दांडगे,शिस्तबंध्द,नियोजन केले आहे.बैठक व्यवस्था, पार्किंग, भोजन अशा सर्वच गोष्टीचे अतिशय नेटके नियोजन करण्यात आले होते. एक लाख विद्यार्थी, नागरिंक, महिला उपस्थित होत्या,कोणताही अनुसुचित घटना घडली नाही, सर्वकाही सुरळीत पार पडल्याने प्रशासन,आणि आश्रम यांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक झाले.
गेल्या वर्षांपासून सुरू झालेल्या कार्यक्रमाला सर्वच वयोगटातील नागरिक उपस्थित होते. आश्रमाचे प्रमुख अमृत्तानंद स्वामी यांनी गेल्या वर्षापासून सुरू केलेल्या या ग्रामीण ऐतिहासिक योग-उत्सवामुळे जत तालुक्यातील व सिमावर्ती भागातील घराघरात योगांची महती पोहचली आहे.निरोगी आरोग्यासाठी यापुढे घरोघरी योग केले जाणार आहे.

बालगाव येथील श्री गुरूदेव आश्रम आयोजित ग्रामीण ऐतिहासिक योग-उत्सवात सुर्यनमस्कार घालताना विद्यार्थी, नागरिंक

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.